आनंदनगरात घरफोडी, २१ लाखांचे दागिने चोरीला

पुण्यातील रास्ता पेठेत भरदिवसा घरफोडी

अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – बनावट चावीने फ्लॅटचे कुलूप उघडून चोरट्यांनी तब्बल २१ लाख १२ हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. ही घटना ९ ते १४ फेबु्रवारीला सिंहगड रस्त्यावरील आनंदनगरातील शिवसागर रेसीडेन्सीमध्ये घडली आहे. याप्रकरणी महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंपनीच्या गोदामातून कॉपर वायर चोरीला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आनंदनगरातील शिवसागर रेसीडेन्सीमध्ये राहायला आहे. ९ ते १४ फेबु्रवारी कालावधीत संबंधित कुटूंबिय बाहेरगावी गेले होते. त्याकाळात चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचे कुलूप बनावट चावीने उघडले. आतमध्ये शिरून कपाटातील तब्बल २१ लाख १२ हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. गावाहून आल्यानंतर तक्रारदार महिलेला चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक पूजा साळुंके तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×