Breking News
Sahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावलेHadapsar Dog Death Case : हडपसरमध्ये मारहाणीत भटक्या श्वानाचा मृत्यूPune Public Drinking Assault Case : दारु पिण्यास मनाई केल्याने तिघांना मारहाणpune molestation case : महिलेचा विनयभंग; पुण्यात माजी पोलीस अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल14 Women Sexual Exploitation Case : धक्कादायक….लग्नाच्या आमिषाने तब्बल १४ महिलांचे लैंगिक शोषणSTEP Skill Training Maharashtra : अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमाचे ‘संत रोहिदास अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम’ असे नामकरण : मंत्री मंगल प्रभात लोढाMission Lakshvedh Maharashtra : ‘मिशन लक्षवेध’आणि बालेवाडी क्रीडा संकुलाच्या विकासकामांचा आढावाAmitesh Kumar Pune : तर बंदोबस्तासाठी १०० अमलदार देतो – पोलीस आयुक्त अमितेश कुमार

Chakan Hinjawadi Infrastructure : चाकण-हिंजवडी परिसरातील कामाबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडून आढावा

Chakan Hinjawadi Infrastructure

वाहतूक कोंडी, नाले व अतिक्रमणांसह रस्ते आणि पर्जन्य जलनिस्सारणाच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय टास्क फोर्सचा आढावा

marathinews24.com

पुणे – Chakan Hinjawadi Infrastructure : चाकण आणि हिंजवडी औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील खड्डे, पर्जन्य जलनिस्सारण, नाल्यांवरील अतिक्रमणे, रस्ते रुंदीकरण, जंक्शन व यु-टर्नचे नियोजन तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी उच्चस्तरीय टास्क फोर्स समितीच्या माध्यमातून आढावा घेतला.

‘घर आमच्या हक्काचं; म्हाडा पुनर्विकासाविरोधात रहिवाशांचे आंदोलन  – सविस्तर बातमी 

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीला यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा समितीच्या सदस्य सचिव ज्योती कदम, पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्यासह एमआयडीसी, महापालिका, पोलीस, महामार्ग आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. (Chakan Hinjawadi Infrastructure) अतिक्रमणे हटविणे, आवश्यक सर्वेक्षण पूर्ण करणे, कामांचे नियोजन करून प्रक्रिया पूर्ण तयार ठेवावी. अशा सूचना जिल्हाधिकारी डुडी यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.

चाकण परिसरातील नाल्यांचे सर्वेक्षण करून त्यावरील अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना देत जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, हंगामी स्वरूपाची अतिक्रमणे तातडीने हटवावीत. अनधिकृत बांधकामांवर नियमानुसार कारवाई करून नाले मोकळे करावेत. परवानगी घेऊन झालेल्या बांधकामांच्या बाबतीत पर्यायी मार्गाने नाला वळविण्यासाठी आवश्यक जागेचे नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी दिले. एमआयडीसी आणि पीएमआरडीएने त्यांच्या कार्यक्षेत्रातील नाल्यांचे सर्वेक्षण करून अतिक्रमणांची माहिती संकलित करावी. वाहतुकीचे प्रमाण, वाहनांची दिशा आणि भविष्यातील वाहतूक वाढ यांचा अभ्यास करून रस्त्यांची रचना निश्चित करण्यावर भर देण्यात आला.

राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजक, यु-टर्न आणि जंक्शनबाबत ट्रॅफिक डेटा व ट्रॅफिक सिम्युलेशनचा अभ्यास करा तसेच वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आवश्यक ठिकाणीच अधिकृत यु-टर्न किंवा जंक्शन ठेवण्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. हिंजवडी आणि चाकण परिसरातील रस्त्यांवरील खड्डे दुरुस्त करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. केवळ खड्डे बुजविण्याऐवजी पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रभावी स्टॉर्म वॉटर ड्रेनेज व्यवस्था उभारणे आवश्यक असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. वाहतूक नियोजनासाठी आयटीएमएस आणि ट्रॅफिक सिम्युलेशनचा वापर करून रस्त्यांच्या डिझाइनमध्ये वाहतूक व्यवस्थापनाचा समावेश करण्यावरही चर्चा झाली.

राष्ट्रीय महामार्ग तसेच सर्व्हिस रोडवर अनधिकृतपणे बस आणि इतर वाहने थांबविल्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याने केवळ अधिकृत बसथांबे व नियोजित बस डेपोवरच वाहने थांबतील, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. अनधिकृत थांबे व पार्किंगविरोधात पोलिस प्रशासनाने कारवाई करावी, असे निर्देश देण्यात आले. तसेच एमएनजीएल, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि संबंधित यंत्रणांशी निगडित पाइपलाइन तसेच नदी प्रदूषणाच्या प्रश्नांवरही बैठकीत आढावा घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

गणेशोत्सवामुळे स्थगित करण्यात आलेली अतिक्रमणविरोधी कारवाई तातडीने पुन्हा सुरू करून आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी डुडी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×