Breking News
Pune ACB Bribery Case : फेरफार नोंदींसाठी २० हजारांची लाच मागितलीPune Cat Theft Case : पर्शियन मांजरीची चोरी करून विक्री; ५ जणांवर गुन्हा दाखलPune Online Fraud News : ‘टॉनिक’च्या नावाने गुगलवर बनावट वेबसाइटPune Theft News : मद्य विक्री दुकानाचे कुलूप तोडून रोकड लंपासKharadi Crime News : दारुच्या नशेत पोलिसांना धक्काबुक्की; दोघांविरुद्ध गुन्हा दाखलKasba Peth Crime News : पुण्यात कसबा पेठ, बुधवार पेठ, गुलटेकडीत पादचाऱ्यांचे मोबाइल हिसकावलेPune Gold Chain Snatching : तरुणीची तीन लाखांची सोनसाखळी हिसकावलीMukhyamantri Matsya Sampada Yojana : मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजना व मासेमारी परवाना सेवा आता पूर्णपणे ऑनलाईनShare Trading Scam Pune : शेअर ट्रेडिंगमधून परताव्याचे आमिष; २५ लाखांची फसवणूकPune Cyber Crime News : पेन्शन कार्डच्या जाहिरातीद्वारे ४ लाख ८५ हजारांची फसवणूक

गुरु तेग बहादुर सिंह यांच्या ३५० व्या शहीद महोत्सवानिमित्त पुण्यात चित्ररथाचे स्वागत

‘हिंद दी चादर’च्या संदेशाने पुणेकर भारावले; विविध ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद

marathinews24.com

पुणे – गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीद महोत्सवानिमित्त त्यांच्या जीवनचरित्रावर आधारित चित्ररथाचे आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. हा चित्ररथ नुकताच पाषाण येथे दाखल झाला असून विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

युनिट मुख्यालय कोटा अंतर्गत अग्निवीर भरती मेळावा खडकी येथे आयोजित – सविस्तर बातमी

सकाळी ११.३० वाजता पाषाण येथील भैरवनाथ मंदिर वस्ती येथे चित्ररथासमोर कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर सुस रोडवरील साई चौक येथे रथ थांबवून नागरिकांना दर्शनाची संधी देण्यात आली. लमाणतांडा पाषाण बाधित वस्ती येथे सुमारे तीन तास चित्ररथ थांबविण्यात आला. या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. तसेच परिसरातील चौकांमध्ये रथ लावून ‘हिंद दी चादर ‘ कार्यक्रमाच्या अनुषंगाने जनजागृती करण्यात आली.

यानंतर औंध येथील जिजामाता चौक (परिहार चौक), औंध गुरुद्वारा, नीलकंठेश्वर मंदिर तसेच छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे रथ लावून कार्यक्रम पार पडले. खडकी येथे मुख्य बाजारपेठ, शिवाजी महाराज स्मारक व खडकी गुरुद्वारा येथेही चित्ररथासमोर विविध धार्मिक व प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या प्रसंगी गणेशजी कलापुरे, विशालजी मेघावत, संदीपजी तुपे, औंध गुरुद्वाराचे विश्वस्त श्री. पंपीनदर सिंग मान, औंध गुरुद्वाराचे पुजारी बाबाजी सिंग, खडकी गुरुद्वारा श्री गुरु सिंह सभा येथील मनमोहन सिंग (ग्यानीजी), बोपोडी संयोजक अक्षयजी मुरडे, अक्षय भेगडे आदी मान्यवर उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×