१६ हजारांची रोकड लुटल्याची घटना १४ जुलैला घोरपडी पेठेत घडली
marathinews24.com
पुणे – मद्यपान करून घरी चाललेल्या तरूणाला अडवून त्याच्यावर वार करीत १६ हजारांची रोकड लुटल्याची घटना १४ जुलैला घोरपडी पेठेत घडली आहे. याप्रकरणी दोघा हल्लेखोरांना खडक पोलिसांनी अटक केली आहे. फारूक मुलाणी (वय २९ रा. घोरपडी पेठ) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी जितेश जम्मन परदेशी (वय ३२) आणि फारूक युसूफ खान (वय ३० दोघेही रा. घोरपडी पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
हडपसरमध्ये बँकेत चोरीचा प्रयत्न – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मुलाणी हे १४ जुलैला मद्यपान करून घरी जात होते. त्यावेळी आरोपी परदेशी आणि खान याच्यासह साथीदाराने मुलाणीला अडविले. त्याच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून गंभीररित्या जखमी केले. त्याच्याकडील १६ हजारांची रोकड जबरदस्तीने हिसकावून चोरून नेली. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींचा माग काढून त्यांना अटक केली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक वळसंग तपास करीत आहेत.
कोंढवा, हांडेवाडीत घरफोडी,दोन लाखांचा ऐवज चोरीला
Crime News : सोसायटीतील तळमजल्यावर असलेल्या खोलीचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी सव्वा लाखांचा ऐवज घरफोडी करून चोरीची घटना १२ जुलैला कोंढव्यातील सातक ब्लॉसम इमारतीत घडली. याप्रकरणी कवीता राठोड (३२, गजानननगर, कोंढवा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार राठोड हे सातक ब्लॉसम इमारतीतील तळमजल्यावर असलेल्या खोलीत राहायला आहेत. १२ जुलैला चोरट्यांनी त्यांच्या दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. २० हजारांची रोकड आणि सोन्या-चांदीचा ऐवज असा १ लाख २५ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील तपास करीत आहेत.
गोदामातून इलेक्ट्रीकल साहित्याची चोरी
गोदामाचा पत्रा उचकटून चोरट्यांनी इलेक्ट्रीकल साहित्याची चोरी केल्याची घटना हांडवाडी रोड येथील ईनामदारवस्ती येथील न्यु सहारा मंडप गोदामात घडली आहे. चोरट्यांनी ५६ हजारांचे इलेक्ट्रीकल साहित्य चोरी करून नेले. याप्रकरणी अमिर वाहब काकर ( वय ३१, रा. सय्यदनगर, महंमदवाडी रोड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यावर काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. १० जुलै ते १३ जुलै दरम्यान हा प्रकार घडला. पुढील तपास काळेपडळ पोलिस करत आहे.
शेअर ट्रेडींगच्या आमिषाने २५ लाखांची फसवणूक
Crime News : शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एकाची २५ लाखांची फसवणूक केली आहे. ही घटना ६ ते १२ जून कालावधीत नांदेड सिटी परिसरात घडली आहे. याप्रकरणी संबंधित व्यक्तीने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाइलधारक चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कुटूंबियासह नांदेड सिटी परिसरात राहायला आहेत. ६ जूनला सायबर चोरट्यांनी त्यांना फोन करून शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळवून देण्याची बतावणी केली. त्यानुसार सुरूवातीला काही रक्कम वर्ग करीत त्यांचा विश्वास संपादित करून घेण्यात आला. त्यानंतर तक्रारदाराने गुंतवणूकीला सुरूवात केली. अवघ्या काही दिवसांत त्यांनी तब्बल २५ लाखांची गुंतवणूक केली. मात्र, त्यावर तक्रारदाराला परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस तपास करीत आहेत.