Breking News
दारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजनइतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज-प्र. के. घाणेकरदगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळलीऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील खाशाबा जाधव पुरस्काराने गौरवित

सोमनाथ सूर्यवंशी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल…

पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय कायम;

ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सर्वोच्च न्यायालयात ऐतिहासिक विजय!

marathinews24.com

दिल्लीवंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज एका महत्त्वपूर्ण ट्वीटद्वारे माहिती दिली आहे की, महाराष्ट्र राज्य आणि इतर विरुद्ध विजयबाई वेंकट सूर्यवंशी या महत्त्वपूर्ण खटल्यात माननीय सर्वोच्च न्यायालयाने विजयबाई सूर्यवंशी यांच्या बाजूने निकाल दिला आहे. या प्रकरणात ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सुप्रीम कोर्टात बाजू मांडली होती.

‘विद्यापीठांनी केवळ शिक्षण नव्हे तर सद्संस्कार आणि सद्भावही द्यावे’ सर्वार्थाने सक्षम भावी पिढीसाठी स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे आवाहन – सविस्तर बातमी

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीतील मृत्यूला जबाबदार असलेल्या पोलिसांवर एका आठवड्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात पोलीस सुप्रीम कोर्टात गेले होते. उच्च न्यायालयाचे आदेश सुप्रीम कोर्टाने कायम ठेवले आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 4 जुलै रोजी दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते, या विरोधात पोलिसांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. आज सकाळी या संदर्भातील सुनावणी पार पडली. सुप्रीम कोर्टाने उच्च न्यायालयाचे आदेश कायम ठेवत पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

ज्यामुळे विजयबाई सूर्यवंशी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणातील त्यांच्या कायदेशीर लढ्याला अखेर यश मिळाल्याचे मानले जात आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या खटल्याच्या निकालाबाबत समाधान व्यक्त केले असून, हा निकाल न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करणारा असल्याचे बोलले जात आहे.

या केसमध्ये पीडित सुर्यवंशी कुटुंबियांच्यावतीने ॲड. प्रकाश आंबेडकर, ॲड. प्रतीक बोंबार्डे, ॲड. कीर्ती आनंद यांनी बाजू मांडली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×