Breking News
Rana Suryawanshi Attack Case : जवळच्या तीन मित्रांनी दिली सुपारी; हल्ल्यानंतर केला मदतीचा बहाणाMahatma Jyotirao Phule : क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष विविध उपक्रमांनी साजरे करण्याचे आवाहनKharadi Bypass Robbery Case : पादचारी जेष्ठेच्या अंगावर पाणी उडवून लुटलेLost Mobile Recovery : वाघोली पोलिसांनी तक्रादारांच्या चेहर्‍यावर फुलवले हसूPune Crime News : पुण्यात पार्किंगच्या वादातून हाणामारीच्या घटनाBopdev Ghat Car Accident : बोपदेव घाटात वाहनाच्या धडकेत मोटार दरीत कोसळलीSugarcane Transport Safety Rules : साखर कारखान्यांच्या ऊस वाहतुकीसाठी आरटीओचे सुरक्षा नियमPune Election 2026 : पदवीधर, शिक्षक मतदारसंघांसाठी मतदान साहित्य घेऊन पथके मतदान केंद्रांकडे रवानाPune Crime News : खुनाच्या प्रयत्नात ५ वर्षांपासून फरार आरोपीला बेड्याPune Domestic Harassment Cases : कौटुंबिक छळामुळे पुण्यात दोन महिलांनी केली आत्महत्या

Cyber Fraud Pune : सिनिअर सिटीझन कार्डची बतावणी, जेष्ठाला १० लाखांचा गंडा

Pune Senior Citizen Pension Fraud

एपीके फाइलद्वारे बँक खात्यातून १० लाख १० हजार रुपये लंपास

marathinews24.com

पुणे – Cyber Fraud Pune : सिनिअर सिटीझन कार्ड मिळवून देण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्याने जेष्ठाला व्हॉट्सअपवर जाहिरात पाठवून तब्बल १० लाख १० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली आहे. ही घटना २९ सप्टेंबरला उंड्री परिसरात घडली आहे. याप्रकरणी प्रâान्सिस रोलॅन्डस अलायस (वय ८०, रा. उंड्री) यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी मोबाइलधारकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कंपनीचे मालक भासवून अकाउंट ला गंडवले – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक अलायस हे मोहम्मद वाडी परिसरातील रहिवासी आहेत. त्यांना २९ सप्टेंबरला सायबर चोरट्यांनी व्हॉट्सअपवर सिनिअर सिटीझन कार्ड बाबत जाहिरात पाठवली. जाहिरातीवर विश्वास ठेवून त्यांनी संबंधित व्यक्तीशी संपर्क साधला. आरोपीने त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना एपीके फाइल पाठवली. Cyber Fraud Pune त्यामध्ये बँक खात्याची माहिती, भरण्यास सांगण्यात आले. अलायस यांनी माहिती भरताच त्यांच्या बँक ऑफ इंडिया येथील खात्यातून परस्पररित्या १० लाख १० हजार रुपये काढून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१९(२), ३१८(४) सह माहिती, तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६ (ड) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक वंदना राठोड तपास करत आहेत.

येरवड्यात ट्रकचालकाने जेष्ठाला चिरडले

भरधाव ट्रक चालकाने दिलेल्या धडकेत पादचारी जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात ३० सप्टेंबरला दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास येरवड्यातील गोल्फ क्लब चौकात घडला आहे. याप्रकरणी ट्रक चालक अब्दुल अलीहसन वाशिद (वय २६ रा. मोशी रोड, चिखली) याला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. नाना जयराम भोसले (वय ७० रा. येरवडा ) असे ठार झालेल्या जेष्ठाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणाचे आजोबा नाना भोसले हे ३० सप्टेंबरला दुपारी सव्वा एकच्या सुमारास गोल्फ क्लब चौकातून पायी निघाले होते. त्यावेळी रस्ता ओलांडत असताना भरधाव ट्रकचालक वाशिदने त्यांना धडक दिली. त्यामुळे भोसले हे गंभीररित्या जखमी झाले. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राठोड तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×