Breking News
Sahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावलेHadapsar Dog Death Case : हडपसरमध्ये मारहाणीत भटक्या श्वानाचा मृत्यूPune Public Drinking Assault Case : दारु पिण्यास मनाई केल्याने तिघांना मारहाणpune molestation case : महिलेचा विनयभंग; पुण्यात माजी पोलीस अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल14 Women Sexual Exploitation Case : धक्कादायक….लग्नाच्या आमिषाने तब्बल १४ महिलांचे लैंगिक शोषणSTEP Skill Training Maharashtra : अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमाचे ‘संत रोहिदास अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम’ असे नामकरण : मंत्री मंगल प्रभात लोढाMission Lakshvedh Maharashtra : ‘मिशन लक्षवेध’आणि बालेवाडी क्रीडा संकुलाच्या विकासकामांचा आढावाAmitesh Kumar Pune : तर बंदोबस्तासाठी १०० अमलदार देतो – पोलीस आयुक्त अमितेश कुमार

Devendra Fadnavis Metro Ride : मेट्रो-3 वरील पहिल्या प्रवासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विद्यार्थिनी, आयटीएन्सशी संवाद

Devendra Fadnavis Metro Ride

नव्या मार्गावर पहिले तिकीट घेऊन केला प्रवास

marathinews24.com

पुणे – Devendra Fadnavis Metro Ride : पुणे मेट्रोच्या नव्या मार्गाचे उद्घाटन आणि पुणे मेट्रो फेज-2 च्या भूमिपूजन कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह शिव छत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी ते हिंजवडी फेज -2 असा मेट्रोतून प्रवास केला. या नव्या मार्गावरील पहिले तिकीट मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी स्वतः घेऊन मेट्रो प्रवासाचा अनुभव घेतला.

पुणे मेट्रोच्या विस्तारामुळे विकासाला नवी गती मिळणार- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी – सविस्तर बातमी 

यावेळी पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी मुख्यमंत्र्यांना मेट्रो मार्ग, स्थानके आणि प्रकल्पाच्या विविध वैशिष्ट्यांची माहिती दिली. या प्रवासात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, पीएमआरडीएचे आयुक्त अभिजीत चौधरी यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.

Devendra Fadnavis Metro Ride या प्रवासाचे विशेष आकर्षण म्हणजे पिंक मेट्रोचे संचालन महिला ट्रेन पायलटकडे होते. लीड ट्रेन पायलट प्रगती बिरादार यांनी मेट्रोचे सारथ्य केले, तर ट्रेन पायलट ऐश्वर्या सूर्यपूजारी यांनीही या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावली. महिला कर्मचाऱ्यांच्या सक्षम सहभागातून आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील महिलांच्या योगदानाचे दर्शन यानिमित्ताने घडले.

प्रवासादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी शाळकरी विद्यार्थिनी, आयटीएन्स यांच्याशी संवाद साधला. मेट्रो प्रवासाचा अनुभव, उपलब्ध सुविधा आणि नव्या मार्गामुळे दैनंदिन प्रवासात होणारे फायदे याविषयी त्यांनी जाणून घेतले. मुख्यमंत्री व मान्यवरांनी हिंजवडी फेज-२ मेट्रो स्थानकापर्यंत सुमारे सहा किलोमीटरचा प्रवास केला.

महिला ट्रेन पायलटच्या नेतृत्वाखाली झालेला हा प्रवास आणि विद्यार्थिनींसह विविध क्षेत्रांतील नागरिकांशी मुख्यमंत्र्यांनी साधलेला संवाद यामुळे नव्या मेट्रो मार्गाच्या उद्घाटनानंतरचा हा प्रवास विशेष ठरला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×