Breking News
सोमनाथ सूर्यवंशी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल…पुण्यातून अपहरण केलेल्या २ वर्षाच्या चिमुकलीची सुटकालोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाहतुकीत बदलसाहित्यरत्न लोकशातिर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या पूर्वसध्येला समाजरत्न पुरस्कार समारंभपुण्यात १२ हजार ७५० विद्यार्थ्यांना मिळणार ‘अंकनाद गणित सात्मीकरण प्रणालीबालमैत्रीपूर्ण आश्रमशाळा उपक्रम आदिवासी मुलांसाठी संरक्षणात्मक वातावरण करण्यास उपयुक्त-प्रदीप देसाईखराडी पार्टी प्रकरणात पोलिसांची कारवाई एकतर्फीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना; यवतमध्ये ३१ जुलैला रस्ता रोकोॠषिकेश ते रामेश्वरम गौ राष्ट्र यात्रेचे पुण्यात उत्साहात स्वागतसैनिक व त्यांच्या कुटुंबांच्या सन्मानासाठी विधी सेवा चिकित्सालय केंद्राचे ठोस पाऊल – आयुक्त पुलकुंडवार

गॅस रिफिलिंग करताना झाला स्फोट, दोघे कामगार भाजले

गॅस रिफिलिंग करताना झाला स्फोट, दोघे कामगार भाजले

धायरीतील घटनेने खळबळ, परवाना नसतानाही गॅसची साठवणूक

marathinews24.com

पुणे – गॅस दुरूस्तीच्या दुकानात विविध कंपनीच्या सिलेंडर टाक्यांचा अनधिकृत साठा करीत मोठ्या टाक्यातून लहान टाक्यात रिफीलिंग करताना स्फोट होउन दोघे कामगार भाजले आहेत. संबंधित दुकानदाराकडे सिलेंडर गॅस साठवणूकीचा परवाना नसतानाही त्याने गॅसचा साठा केल्याचे उघडकीस आले आहे. त्यासोबतच कामगारांच्या सुरक्षिततेची काळजी न घेता त्यांना गॅस रिफिलिंगसाठी काम देउन धोका निर्माण केल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना २ जूनला धायरीतील शेषनाग अप्लायन्सेसमध्ये घडली.

ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावणाऱ्याला बेड्या – सविस्तर बातमी 

दुकानमालक आशिष अशोक मोरे (रा. धायरी) आणि कामगार महेश वासुदेव वाडीकर (रा. बिदर कर्नाटक) गणेश दत्तात्रय पाटील (रा. इंद्राळ, लातूर) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. वाडीकर आणि पाटील स्फोटात जखमी झाले आहेत. पोलीस अमंलदार संग्राम शिनगारे यांनी नांदेडसिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आशिष मोरे यांचे धायरीत शेषनाग अप्लायन्सेस दुकान आहे. त्यांच्याकडे गॅस सिलेंडर टाक्यांची साठवणूक करण्याचा परवाना नाही. मात्र, तरीही त्यांनी दुकानात गॅसचा साठा करीत दोघा कामगारांना कामाला ठेवले होते. २ जूनला दुकानात मोठ्या गॅस टाक्यांतून लहान गॅस टाक्यात रिफिलिंग केले जात होते. त्यावेळी गॅसगळती होउन स्फोट झाल्यामुळे कामगारासह दुकानातील दोघेही कामगार भाजले गेले. माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तातडीने पथक घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी आरोपी दुकानदार मोरेसह इतर दोघा कर्मचार्‍यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गॅस रिफिलिंग करताना स्फोट होउन दोघे कामगार भाजले असून, याप्रकरणी दुकान मालकासह तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. संबंधिताला गॅस टाक्यांचा कोण पुरवठा करतो, याचाही तपास केला जात आहे. – प्रवीण जाधव, सहायक पोलीस निरीक्षक, नांदेड सिटी पोलीस ठाणे

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top