हातचलाखीने सोन्याचे दागिने चोरून चोरटा पसार
marathinews24.com
पुणे – वाहतूक पोलीस असल्याची बतावणी करुन ज्येष्ठाकडील ५ लाख २० हजार रुपयांचे दागिने चोरुन नेल्याची घटना पौड फाटा चौकात घडली. या प्रकरणी चोरट्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ज्येष्ठाकडील १ लाखांचा मोबाइल हिसकावला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६२ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे कोथरूडमधील भुसारी काॅलनीत राहायला आहेत. ते बुधवारी (१८ नोव्हेंबर) पौड फाटा चौकातून दुपारी निघाले होते. काही अंतरावर चोरट्याने त्यांना अडविले. चोरट्याने वाहतूक पोलीस असल्याची बतावणी केली. सिग्नल मोडला असल्याचे सांगून चोरट्याने दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांना सांगितले. त्यानंतर चोरट्याने त्यांना बोलण्यात गुंतविले. त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधली. हातचलाखीने त्यांच्याकडील ५ लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून चोरटा पसार झाला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांनी घटनास्थळी भेट दिली. पौड फाटा चौकातील सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पसार झालेल्या चोरट्याचा शोध घेण्यात येत आहेत. सहायक पोलीस निरीक्षक सुप्रिया जगताप तपास करत आहेत.






















