Breking News
Maharashtra Child Parliament 2026 : विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेवर १०२ बालप्रतिनिधी मांडणार विचार; यशदामध्ये २० नोव्हेंबरला बाल संसदPune Slum Rehabilitation Scheme : झोपडपट्टीधारकांना मोफत घरांचा लाभ वेळेत मिळण्यासाठी प्रशासन व विकसकांनी समन्वयाने काम करावे – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयरKothrud Drought Relief : चंद्रकांतदादा पाटील यांच्या आवाहनाला कोथरुडकरांचा प्रतिसादPune Science Literature Conference : पुण्यात विज्ञान साहित्य नांदी संमेलनाचे गुरुवारी आयोजन- डॉ. नितीन करमाळकरJalyukt Shivar 3.0 : राज्यात ३४ लाखांहून अधिक भूजल पुनर्भरण संरचनांच्या निर्मितीचे उद्दिष्ट मे २०२७ पर्यंत पूर्ण करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसPune Pistol Seizure News : पुण्यात सराइताकडून दोन पिस्तूलांसह काडतुसे जप्तDigital Arrest Scam Pune : अटकेची दाखवली भीती, महिलेला ३० लाखांचा गंडाPune House Robbery : पुण्यात कात्रज, लोहगावमध्ये घरफोडीHinjawadi Man Marunji Development : हिंजवडी, माण, मारुंजी परिसरातील विकासकामांना गती द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीChakan Traffic Management : चाकण- तळेगाव परिसरातील पायाभूत सुविधा, वाहतूक आणि अतिक्रमणांवर व्यापक उपाययोजना करा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Pune Crime News : ज्येष्ठाकडील १ लाखांचा मोबाइल हिसकावला

Pune Crime News

वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पादचारी ज्येष्ठ नागरिकाकडील १ लाख रुपयांचा मोबाइल दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घोरपडीतील बी. टी. कवडे रस्त्यावर घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात वैमनस्यातून अल्पवयीनावर वार करून खून – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७१ वर्षीय ज्येष्ठ नागरिक बुधवारी सकाळी सातच्या सुमारास फिरायला निघाले होते. बी. टी. कवडे रस्त्यावर दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या हातातील एक लाख रुपयांचा मोबाइल हिसकावून नेला. पोलीस उपनिरीक्षक बगाडे तपास करत आहेत.

शिवीगाळ केल्या प्रकरणी मुख्याध्यापिकेविरुद्ध गुन्हा

जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील मुख्याध्यापिकेविरुद्ध समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.याबाबत शाळेतील कर्मचारी महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ॲट्रोसिटी ॲक्ट ३ (१) (आर), ३ (१), (एस), तसेच भारतीय न्याय संहिता ३५१ (१), ३५२ अन्वये गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मुख्याध्यापिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आणि मुख्याध्यापिका रास्ता पेठेतील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत कामाला आहेत. गेल्या महिन्यात १८ ऑक्टोबर मुख्याध्यापिकेने जातीवाचक शिवीगाळ केली. ‘तुमची काम करायची लायकी नाही’, अशा शब्दांत अपमानित केले, असा आरोप तक्रारदार महिलेने फिर्याद दिली आहे. महिलेने केलेल्या आरोपांनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फरासखाना विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×