चौघे अल्पवयीन ताब्यात
marathinews24.com
पुणे – Fursungi Murder Case : वैमनस्यातून अल्पवयीनावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना हडपसर भागातील फुरसुंगी परिसरात मंगळवारी (दि. १७) रात्री घडली. खून करुन पसार झालेल्या चौघा अल्पवयीनांना पोलिसांना ताब्यात घेतले आहे. करण रवींद्र नागटिळक (वय १७, रा. भोसले व्हिलेज, श्री दत्त मंदिराजवळ, भेकराईनगर, फुरसुंगी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत करण याची बहीण सोनाली (वय २२) हिने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पुण्यातील विविध भागात घरफोडी, लाखोंचा ऐवज चोरीला – सविस्तर बातमी
‘खून प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेले चौघे अल्पवयीन हडपसरमधील काळेपडळ भागात राहायला आहेत. नागटिळक कुटुंबीय मूळचे सोलापूर जिल्ह्यातील आहेत. करणचे आई-वडील मजूरी करतात. आरोपींशी करणचा काही महिन्यांपूर्वी वाद झाला होता. (Fursungi Murder Case) मंगळवारी (१७ नोव्हेंबर) रात्री आठच्या सुमारास करण फुरसुंगीतील भोसले व्हिलेज परिसरातील रेल्वे मार्गाजवळून निघाला होता. हडपसर ते सासवड स्थानक दरम्यान असलेल्या रेल्वे मार्गालगत अल्पवयीन आरोपींनी त्याला गाठले. त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले.
हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसंनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले’, अशी माहिती फुरसुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनी दिली. पसार झालेल्या चौघा अल्पवयीनांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक मोरे तपास करत आहेत.






















