Breking News
Mukhyamantri Gramin Pashudhan Yojana : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी लवकरच ऑनलाइन अर्जCarl Ross Filmmaking : साचेबद्धपणा टाळून चित्रपट निर्मिती करा-कार्ल रॉसSenior Citizen Health Camp : सामाजिक न्याय भवन येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिरBlood Donation Campaign : सेवा संकल्प अभियानातून ‘रक्तदानाचा संकल्प’; पुणे जिल्ह्यात जीवनदानाची चळवळPune Police Suicide : पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाची गोळी झाडून आत्महत्याPune Crime Branch : पुण्यात एक वर्षापासून फरार आरोपीला अटकVishrantwadi Crime : दुचाकी पार्किंगचा वाद कोयते उगारण्यावरMobile Banking Fraud : मोबाइल बँकिंगचा घेतला ताबा, १० लाखांचा गंडाPune Graduate Teacher Election : पुणे विभाग पदवीधर, शिक्षक द्विवार्षिक निवडणूक- २०२६; जिल्हास्तरीय माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती कार्यान्वितBajaj Pune Grand Tour : बजाज पुणे ग्रँड टूरला UCI 2.1 श्रेणी; २६ ते ३१ जानेवारीदरम्यान सहा टप्प्यांची स्पर्धा

Foreign Language Training : जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोलीतून जगाच्या भाषांची खिडकी खुली …!!

Foreign Language Training : जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोलीतून जगाच्या भाषांची खिडकी खुली ...!!

पुणे जिल्ह्यातील २१९ शिक्षकांना जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश, रशियन आणि जपानी भाषांचे प्रशिक्षण; ग्रामीण विद्यार्थ्यांना जागतिक भाषा व संस्कृतीची ओळख करून देण्याचा उपक्रम

marathinews24.com

पुणे – Foreign Language Training : कल्पना करा… पुणे जिल्ह्यातील एखाद्या ग्रामीण शाळेतील वर्गखोली. समोर मराठी माध्यमातील विद्यार्थी आणि फळ्यावर शिक्षक लिहित आहेत…Guten Tag, Bonjour, Hola, こんにちは…! काही वर्षांपूर्वी अशक्य वाटणारे हे चित्र आता पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रत्यक्ष आकार घेत आहे. गावच्या शाळेतील विद्यार्थ्यांसमोर आता केवळ आपल्या परिसराचे नव्हे, तर विविध देशांचे आणि संस्कृतींचे दालन उघडत आहे.

शिरूर नगरपरिषदेतर्फे ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत विविध उपक्रम – सविस्तर बातमी 

जगाच्या नकाशावरची दूरची देश आता डिजिटल माध्यमातून जवळ आली आहेत. शिक्षण, तंत्रज्ञान, उद्योग, रोजगार आणि संवादाच्या नव्या संधींमध्ये भाषेचे महत्त्व वाढत आहे. या बदलाची जाणीव ठेवून पुणे जिल्हा परिषदेने ग्रामीण विद्यार्थ्यांना जागतिक स्तराशी जोडणारे एक वेगळे पाऊल टाकले आहे…शिक्षकांनाच परकीय भाषा शिकविण्याचे. (Foreign Language Training)

पुणे जिल्हा परिषद आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. हे या उपक्रमाचे दुसरे वर्ष आहे. यंदा २१९ शिक्षक जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश, रशियन आणि जपानी या पाच भाषांचे प्रशिक्षण घेत आहेत.

यामध्ये जर्मन भाषेसाठी १२६, फ्रेंचसाठी २२, स्पॅनिशसाठी २२, रशियनसाठी २३ आणि जपानीसाठी २५ शिक्षक सहभागी झाले आहेत. म्हणजे जिल्ह्याच्या विविध भागांतील २१९ शिक्षक सध्या आपल्या परिचित भाषेच्या पलीकडे जाऊन एका नव्या भाषेचे जग समजून घेत आहेत.

शब्दांच्या पलीकडचा हा प्रवास

परकीय भाषा शिकणे म्हणजे काही शब्द पाठ करणे किंवा वेगळी लिपी ओळखणे एवढेच नाही. (Foreign Language Training) एका भाषेबरोबर त्या भाषेचा देश, तेथील संस्कृती, परंपरा, जीवनपद्धती आणि जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही समोर येतो. म्हणूनच या प्रशिक्षणात केवळ पुस्तकातील धडे नाहीत. ऐकणे, वाचन, लेखन आणि बोलणे या चारही कौशल्यांवर भर दिला जात आहे. शिक्षकांसाठी १८० तासांचा संरचित भाषा अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे. भाषेचा प्रत्यक्ष वापर करता यावा, हा प्रशिक्षणामागील महत्त्वाचा उद्देश आहे.

शिक्षक शिकतात… आणि त्यातून विद्यार्थी शिकतात

या उपक्रमाचे खरे वैशिष्ट्य इथे आहे.एक शिक्षक परकीय भाषा शिकतो म्हणजे केवळ एका व्यक्तीच्या ज्ञानात भर पडत नाही. तो शिक्षक जेव्हा आपल्या वर्गात जातो, तेव्हा त्या ज्ञानाची पुढची वाटचाल सुरू होते. काही नवे शब्द, एखादे अभिवादन, एखाद्या देशाची संस्कृती, तेथील जीवनशैली किंवा जगाच्या दुसऱ्या भागातील एखादा संदर्भ..हे सर्व विद्यार्थ्यांच्या वर्गखोलीत पोहोचते.

पहिल्या वर्षी १०२ शिक्षकांनी प्रशिक्षण घेतले. या शिक्षकांनी प्रत्येकी सुमारे ५० विद्यार्थ्यांपर्यंत परकीय भाषा आणि संबंधित भाषा-संस्कृतीची माहिती पोहोचविली. त्यामुळे पाच हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लाभ मिळाला. एक शिक्षक, पन्नास विद्यार्थी आणि त्यातून निर्माण होणारी नवी उत्सुकता… या साध्या साखळीचा गुणात्मक परिणाम मोठा आहे.

ग्रामीण शाळेतील विद्यार्थ्यांसाठी नवे क्षितिज

शहरातील अनेक विद्यार्थ्यांना विविध भाषा आणि संस्कृतींचा परिचय वेगवेगळ्या माध्यमांतून मिळतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मात्र अशा संधी तुलनेने मर्यादित असू शकतात. ही दरी कमी करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून होत आहे.

जपान कुठे आहे? जर्मनीत कोणती भाषा बोलली जाते? फ्रान्सची संस्कृती कशी आहे? स्पॅनिश भाषेचा विस्तार किती मोठा आहे? रशियन भाषा कशी ऐकू येते? असे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होणे हीच या उपक्रमाची सुरुवात आहे.कारण भाषा शिकण्यापूर्वी भाषेबद्दल कुतूहल निर्माण होणे महत्त्वाचे असते. हे कुतूहल पुढे वाचनाची सवय, संवादकौशल्य आणि विविध संस्कृती समजून घेण्याची दृष्टी विकसित करू शकते. जगाकडे केवळ नकाशावर पाहण्याऐवजी तेथील लोक, भाषा आणि संस्कृती समजून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळते.

स्थानिक माती, जागतिक दृष्टी

Foreign Language Training जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्याने आपल्या मातृभाषेत शिक्षण घेत असतानाच जगातील अन्य भाषा समजून घेण्याचा प्रयत्न करणे, ही दोन टोकांची गोष्ट नाही. उलट, आपल्या भाषेची आणि संस्कृतीची मुळे घट्ट ठेवून जगाशी संवाद साधण्याची क्षमता निर्माण करणे, हा शिक्षणाचा व्यापक अर्थ आहे.

“परकीय भाषांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध भाषा, संस्कृती आणि जागतिक संदर्भांची ओळख करून देता येते. हा उपक्रम शिक्षकांच्या क्षमता वृद्धीसोबतच त्याचा लाभ हजारो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणारा आहे,” असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सांगितले.

आज २१९ शिक्षक नव्या भाषांचे धडे घेत आहेत. उद्या त्यांच्या वर्गखोल्यांमध्ये या भाषांचे काही शब्द उमटतील. त्यातून विद्यार्थ्यांच्या मनात नवे प्रश्न निर्माण होतील. प्रश्नांमधून कुतूहल आणि कुतूहलातून ज्ञानाची नवी दारे उघडतील. गावच्या वर्गखोलीतून जगाशी जोडणारा हा प्रवास शब्दांपासून सुरू झाला आहे; त्याची दिशा मात्र विद्यार्थ्यांच्या व्यापक भविष्यात आहे.

संकलन :- जिल्हा माहिती कार्यालय, पुणे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×