Breking News
Sahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावलेHadapsar Dog Death Case : हडपसरमध्ये मारहाणीत भटक्या श्वानाचा मृत्यूPune Public Drinking Assault Case : दारु पिण्यास मनाई केल्याने तिघांना मारहाणpune molestation case : महिलेचा विनयभंग; पुण्यात माजी पोलीस अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल14 Women Sexual Exploitation Case : धक्कादायक….लग्नाच्या आमिषाने तब्बल १४ महिलांचे लैंगिक शोषणSTEP Skill Training Maharashtra : अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमाचे ‘संत रोहिदास अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम’ असे नामकरण : मंत्री मंगल प्रभात लोढाMission Lakshvedh Maharashtra : ‘मिशन लक्षवेध’आणि बालेवाडी क्रीडा संकुलाच्या विकासकामांचा आढावाAmitesh Kumar Pune : तर बंदोबस्तासाठी १०० अमलदार देतो – पोलीस आयुक्त अमितेश कुमार

Free Diwali Workshop Pune : औंध-बोपोडीतील चिमुकल्यांच्या कल्पकतेला मिळाली नवी झळाळी!

Free Diwali Workshop Pune

मोफत आकाशकंदील कार्यशाळेतून बालसर्जनशीलतेला प्रोत्साहन; नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांसाठी सामाजिक उपक्रम; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

marathinews24.com

पुणे – Free Diwali Workshop Pune : विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे, त्यांच्यातील सर्जनशीलता विकसित करणे आणि पारंपरिक हस्तकलेची ओळख नव्या पिढीला करून देण्याच्या उद्देशाने कै.इंदिरा गांधी प्राथमिक विद्यालय,औंध आणि छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, बोपोडी येथे मोफत आकाशकंदील निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या पुढाकारातून झालेल्या या उपक्रमाला विद्यार्थी, पालक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डधारक ३० स्केटर्सचा अचिव्हर्स स्पीड स्केटिंग क्लबतर्फे सत्कार – सविस्तर बातमी 

कार्यशाळेत प्रशिक्षक चारुदत्त वाईडकर यांनी आकाशकंदील तयार करण्याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेतून आकर्षक आकाशकंदील तयार करत हस्तकलेचा आनंद घेतला. आर्थिक परिस्थितीचा विचार न करता प्रत्येक मुलाला अशा उपक्रमांमध्ये सहभागी होता यावे आणि त्यांना प्रत्यक्ष कृतीतून नवीन कौशल्ये शिकता यावीत, हा या कार्यशाळेमागील सामाजिक दृष्टिकोन होता.

यावेळी नगरसेवक सनी विनायक निम्हण म्हणाले, “प्रत्येक मुलामध्ये काही ना काही वेगळे कौशल्य आणि प्रतिभा दडलेली असते. (Free Diwali Workshop Pune) गरज असते ती केवळ योग्य संधी आणि प्रोत्साहनाची! आर्थिक परिस्थिती किंवा इतर कोणत्याही मर्यादांमुळे मुलांच्या कल्पकतेला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी अशा मोफत उपक्रमांचे आयोजन करणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. मुलांच्या हातांना कौशल्य, विचारांना दिशा आणि स्वप्नांना बळ देणे, हाच आमच्या उपक्रमांचा खरा उद्देश आहे. आजच्या मुलांमध्ये उद्याचा सक्षम समाज घडविण्याची ताकद आहे. त्यामुळे त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबत कला, संस्कृती आणि कौशल्यविकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यावर आमचा विशेष भर राहील.”

या प्रसंगी माजी नगरसेविका शैलजाताई खेडेकर,पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे सदस्य अमित मुरकुटे,माजी स्वीकृत नगरसेवक वसंत जुनवणे, सामाजिक कार्यकर्ते सुनील रानवडे, मधुरा निम्हण,विशाल उंडे, ज्येष्ठ नागरिक जमदाग्नी भास्कर,माजी शिक्षक व शिक्षण केंद्रप्रमुख आत्माराम जाधव,रमेश जुनवणे, प्रदीप खेडेकर, संजय मांजिरे, अमर खंडागळे, देवा रेड्डी, उमेश वाघ आणि विशाल बहिरट यांच्यासह विविध क्षेत्रांतील कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

या कार्यशाळेच्या नियोजनासाठी वैशाली पोतदार, पूजा चोंधे, पूजा वाघमारे, नचिकेत राऊत यांच्यासह गणेश शेलार आणि बाळासाहेब बानगुडे यांनी घेतलेली मेहनत आणि केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देतानाच पारंपरिक कलेचे जतन आणि सर्वसमावेशक सहभागाचा संदेश देणारी ही कार्यशाळा औंध-बोपोडीकरांसाठी आनंददायी ठरली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×