Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

विधान भवनात महात्मा फुले द्विशताब्दी वर्षाच्या प्रारंभी कृतज्ञतापूर्वक अभिवादन

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा समतेचा संदेश

marathinews24.com

  1. मुंबई –  क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जन्म द्विशताब्दी वर्षाच्या प्रारंभी आज विधान भवन येथे अभिवादन करण्यात आले. यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भावनिक शब्दांत सांगितले की, “ज्या महिलांना शिक्षणाचा लाभ झाला, त्यांच्यापैकी मी स्वतः एक आहे. आम्ही सर्वजणी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या मानसकन्या आहोत. आज माझ्या हस्ते येथे अभिवादन होत आहे, हे सर्व त्यांच्या आणि सर्व समाजसुधारकांच्या कार्याचे श्रेय आहे. मी त्यांना मनापासून नतमस्तक होऊन अभिवादन करते.”

अनाथ मुलांच्या हस्ते सातव्या ‘सिंधी प्रीमिअर लीग’चे उद्घाटन – सविस्तर बातमी

यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले. कार्यक्रमास विधानमंडळ सचिवालयाचे सचिव-४ शिवदर्शन साठ्ये, उपसचिव श्री. विजय कोमटवार, उपसभापतींचे खासगी सचिव श्री. अविनाश रणखांब, संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक व जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या मनोगतात महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव करत शिक्षण, समता आणि सामाजिक प्रबोधनाचा संदेश अधोरेखित केला. त्यांनी सांगितले की, फुले दांपत्याच्या प्रयत्नांमुळे समाजात परिवर्तनाची चळवळ उभी राहिली.

त्या पुढे म्हणाल्या की, द्विशताब्दी वर्षानिमित्त समाजात समता, बंधुभाव आणि सर्वसमावेशक विकासासाठी नव्याने संकल्प करण्याची गरज आहे. शिक्षण, विकास, तंत्रज्ञान आणि सुशासनाच्या माध्यमातून प्रगत समाज घडविण्याचे आवाहनही त्यांनी केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×