Breking News
MPSC Protest Pune : ‘पुणे बंद करण्याची भूमिका घेत असाल तर पुणेकरच उत्तर देतील’; MPSC आंदोलनावर आमदार डावखरेंचा रोहित पवारांना सल्लाMPSC Protest: एमपीएससी आंदोलनाविरोधात जनहित याचिकाFarmers, Drought : दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूरPune Crime : पुण्याच्या ग्रामदैवताची दानपेटी फोडली, आरोपीला बेड्या630 Special Teachers Felicitation : दिव्यांग विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या विशेष शिक्षकांच्या कार्याचा गौरवVasundhara Pady Dindi : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘वसुंधरा पायी दिंडी’चे प्रस्थानDr Anil Dudhabhate Medical Award : ‘दृष्टीदूत’ डॉ. अनिल दुधभाते यांना मराठवाडा युवा मंचचा वैद्यकीय पुरस्कारSeva Sankalp Abhiyan : ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत बारामतीत महिला आरोग्य, अवयवदान व रक्तदानाबाबत जनजागृतीSonali Kulkarni : चित्रपटाविषयी प्रेक्षकांनी सम्यक प्रतल शोधणे आवश्यक-सोनाली कुलकर्णीPune Crime : भरदिवसा दुचाकीच्या डिक्कीतून दागिने चोरीला

House Burglary : घराचे कुलूप तोडून पावणेदोन लाखांचा ऐवज चोरी

House Burglary : घराचे कुलूप तोडून पावणेदोन लाखांचा ऐवज चोरी

सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास, पोलिसांकडून तपास सुरू

marathinews24.com

पुणे – House Burglary  : घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दागिने, रोकड असा पावणेदोन लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना गोखलेनगरमधील जनवाडी भागात घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सहकारनगरमध्ये ज्येष्ठ महिलांचे दागिने हिसकावले – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाचे जनवाडी भागातील अरुण कदम चौकात घर आहे. ४ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास घर बंद करुन ते नातेवाईकांकडे गेली. सायंकाळी ते घरी परतले. तेव्हा घराचे कुलूप तोडण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. (House Burglary) चोरट्याने कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा पावणेदोन लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेले. घरफोडीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. जनवाडी भागात दाटीवाटीने घरे आहेत. घरफोडी करणारा चोरटा माहितगार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, पोलीस उपनिरीक्षक स्नेहल पाटील तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×