Breking News
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हाकस्टमने पकडल्याचे सांगून तरुणीची २२ लाखांची फसवणूक

गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी लहुजी सेनेचं दीनानाथ रुग्णालयात अर्धनग्न आंदोलन…

गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी लहुजी सेनेच् दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या टेरेसवर जाऊन कार्यकर्त्यच अर्धनग्न आंदोलन

Marathinews24.com

पुणे – भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिशा भिसे यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासना कडून उपचारासाठी पैशांची अडवणूक केल्याने गर्भवती तनिशा यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप कुटुंबियांकडून करण्यात आला आहे.

या घटनेची माहिती माध्यमातून समोर आल्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाबाबत संतप्त प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी राज्य सरकारमार्फत समिती देखील नेमण्यात आली आहे.

ससून रुग्णालयाच्या इमारतीवरून दारूच्या नशेत मारली उडी अन दिला जीव – सविस्तर बातमी

मागील दोन दिवसांपासून रुग्णालयाबाहेर विविध संघटनामार्फत आंदोलन करीत निषेध नोंदविला जात आहे.तर आज शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली रुग्णालय प्रशासनावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करीत यावेळी चिल्लर फेकून निषेध नोंदविला. तसेच काल पतितपावन संघटनेकडून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या फलकाला काळे फासून निषेध नोंदविला होता. त्यामुळे आज रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी नावाचा फलक काढून टाकला.तर त्याच दरम्यान दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास लहुजी सेनेचे दोन कार्यकर्ते दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या नवव्या मजल्यावरील टेरेसवर जाऊन कार्यकर्त्यच अर्धनग्न आंदोलन सुरू आहे.रुग्णालय प्रशासनावर कारवाई करण्यात यावी,या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×