Breking News
Pune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवलेPune Grand Tour 2027 : शेतीमालाच्या बाजारपेठांपासून पर्यटनापर्यंत नव्या संधी; ‘पुणे ग्रँड टूर’साठी ३९ ग्रामपंचायतींनी मांडला आभाराचा ठरावSahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावलेHadapsar Dog Death Case : हडपसरमध्ये मारहाणीत भटक्या श्वानाचा मृत्यूPune Public Drinking Assault Case : दारु पिण्यास मनाई केल्याने तिघांना मारहाणpune molestation case : महिलेचा विनयभंग; पुण्यात माजी पोलीस अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल14 Women Sexual Exploitation Case : धक्कादायक….लग्नाच्या आमिषाने तब्बल १४ महिलांचे लैंगिक शोषण

Maharashtra Kesari 2026 : पै. हर्षवर्धन सदगीर यांनी महाराष्ट्र केसरी किताबासह कुस्तीप्रेमींची मने जिंकली

Maharashtra Kesari 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

marathinews24.com

पुणे – Maharashtra Kesari 2026 : महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेत हर्षवर्धन सदगीर यांनी आपल्या जिद्द, ताकद आणि कौशल्याच्या जोरावर महाराष्ट्र केसरीच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. तर उपविजेता महेंद्र गायकवाड यांनीही तितक्याच दमदार कामगिरीतून कुस्ती रसिकांची मने जिंकली आहेत, असे गौरवोद्गार काढत या स्पर्धेतील विजेते हर्षवर्धन सदगीर आणि उपविजेते महेंद्र गायकवाड यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.

‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम मुलींच्या स्वसंरक्षणाच्यादृष्टीने महत्त्वाचा उपक्रम- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे – सविस्तर बातमी 

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आपल्या संदेशात म्हणतात की, वाघोली येथे पार पडलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम लढतीत प्रेक्षकांना श्वास रोखून धरायला लावणारा थरार अनुभवायला मिळाला. गादी विभागातील विजेता हर्षवर्धन सदगीर आणि माती विभागातील विजेता महेंद्र गायकवाड यांच्यात झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात हर्षवर्धन सदगीर यांनी दमदार खेळ करत मानाची महाराष्ट्र केसरी गदा पटकावली. अंतिम सामन्यातील हर्षवर्धन सदगीर आणि महेंद्र गायकवाड यांची झुंज ही खऱ्या अर्थाने कुस्ती परंपरेची मान उंचावणारी ठरली. कुस्ती हा महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला, परंपरेचा ठेवा असलेला रांगडा क्रीडाप्रकार आहे, कुस्तीच्या माध्यमातूनच पै. खाशाबा जाधव यांनी भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून दिले. ही परंपरा पुढे नेण्याचे काम आजचे तरुण पैलवान करत आहेत, ही अभिमानास्पद बाब आहे.

वाघोली येथे पार पडलेल्या Maharashtra Kesari 2026 च्या स्पर्धेत अनेक रोमांचक आणि चुरशीचे सामने रंगले. भव्य आणि उत्कृष्ट नियोजनामुळे स्पर्धेला विशेष उठाव प्राप्त झाला. या स्पर्धेतील विजेत्या-उपविजेत्यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×