Breking News
MPSC Protest Pune : ‘पुणे बंद करण्याची भूमिका घेत असाल तर पुणेकरच उत्तर देतील’; MPSC आंदोलनावर आमदार डावखरेंचा रोहित पवारांना सल्लाMPSC Protest: एमपीएससी आंदोलनाविरोधात जनहित याचिकाFarmers, Drought : दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूरPune Crime : पुण्याच्या ग्रामदैवताची दानपेटी फोडली, आरोपीला बेड्या630 Special Teachers Felicitation : दिव्यांग विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या विशेष शिक्षकांच्या कार्याचा गौरवVasundhara Pady Dindi : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘वसुंधरा पायी दिंडी’चे प्रस्थानDr Anil Dudhabhate Medical Award : ‘दृष्टीदूत’ डॉ. अनिल दुधभाते यांना मराठवाडा युवा मंचचा वैद्यकीय पुरस्कारSeva Sankalp Abhiyan : ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत बारामतीत महिला आरोग्य, अवयवदान व रक्तदानाबाबत जनजागृतीSonali Kulkarni : चित्रपटाविषयी प्रेक्षकांनी सम्यक प्रतल शोधणे आवश्यक-सोनाली कुलकर्णीPune Crime : भरदिवसा दुचाकीच्या डिक्कीतून दागिने चोरीला

MPSC Protest Pune : ‘पुणे बंद करण्याची भूमिका घेत असाल तर पुणेकरच उत्तर देतील’; MPSC आंदोलनावर आमदार डावखरेंचा रोहित पवारांना सल्ला

MPSC Protest Pune

शास्त्री रोडवरील आंदोलनाला निरंजन डावखरेंची भेट; ‘विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राजकारण नको, मुख्यमंत्र्यांपर्यंत मागण्या पोहोचवू’

marathinews24.com

पुणे – MPSC Protest Pune : एमपीएससीच्या परीक्षापद्धतीसह विविध मागण्यांसाठी पुण्यातील अहिल्या अभ्यासिका येथे गेल्या पाच दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांची विधानपरिषद आमदार निरंजन डावखरे यांनी मंगळवारी भेट घेतली. विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून, त्यांच्या मागण्यांवर कारवाई सुरू असल्याचा दावा डावखरे यांनी यावेळी केला.

एमपीएससी आंदोलनाविरोधात जनहित याचिका – सविस्तर बातमी

“अधिवेशनामध्ये आम्ही स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सातत्याने मांडत आलो आहोत. स्वतः मुख्यमंत्र्यांसोबत विद्यार्थ्यांच्या तीन-तीन तास बैठका झाल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या जवळपास सर्व मागण्या मान्य झाल्या असून, आणखी काही मागण्या असतील तर त्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठीच आज आंदोलनस्थळी आलो आहे,” असे डावखरे म्हणाले.

एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवरूनही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. “ही मागणी विद्यार्थ्यांची आहे की काही लोकांना यातून स्वतःची राजकीय पोळी भाजायची आहे, हा मूळ प्रश्न आता निर्माण झाला आहे,” अशी टीका त्यांनी केली. “एमपीएससी अध्यक्षपद हे संविधानिक पद असल्याने त्यांच्याबाबत कारवाई करण्यासाठी जी प्रक्रिया आवश्यक आहे, ती सुरू झालेली आहे. MPSC Protest Pune अशा परिस्थितीत अडमुठी भूमिका घेऊन विद्यार्थ्यांना वेठीस धरून अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे का, हे पाहावे लागेल,” असेही डावखरे यांनी सांगितले.

दरम्यान, आंदोलनाला चुकीची दिशा देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत डावखरे यांनी रोहित पवार यांच्यावरही निशाणा साधला. “पुणे हे नेहमी सर्वांना दिशा देण्याचे काम करते. पुणे बंद करण्याची भूमिका घेतली जात असेल तर पुणेकरच त्या लोकांना कसे बंद करतील, हे कळणार नाही. पुण्याशी कोणी पंगा घेऊ नये, असा माझा मैत्रीपूर्ण सल्ला आहे,” असे ते म्हणाले.

“रोहित पवार हे स्वतः आमदार आहेत. ते हक्काने मुख्यमंत्र्यांना भेटून विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडू शकतात. अधिवेशनातही हे मुद्दे उपस्थित करता येतात. आमदार म्हणून आपल्याकडे अनेक आयुधे आहेत,” असे डावखरे यांनी स्पष्ट केले. अहिल्या अभ्यासिका येथे सुरू असलेल्या आंदोलनात विद्यार्थी एमपीएससीची परीक्षा वस्तुनिष्ठ (Objective) पद्धतीने घेण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून आंदोलन करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×