Breking News
Mukhyamantri Gramin Pashudhan Yojana : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी लवकरच ऑनलाइन अर्जCarl Ross Filmmaking : साचेबद्धपणा टाळून चित्रपट निर्मिती करा-कार्ल रॉसSenior Citizen Health Camp : सामाजिक न्याय भवन येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिरBlood Donation Campaign : सेवा संकल्प अभियानातून ‘रक्तदानाचा संकल्प’; पुणे जिल्ह्यात जीवनदानाची चळवळPune Police Suicide : पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाची गोळी झाडून आत्महत्याPune Crime Branch : पुण्यात एक वर्षापासून फरार आरोपीला अटकVishrantwadi Crime : दुचाकी पार्किंगचा वाद कोयते उगारण्यावरMobile Banking Fraud : मोबाइल बँकिंगचा घेतला ताबा, १० लाखांचा गंडाPune Graduate Teacher Election : पुणे विभाग पदवीधर, शिक्षक द्विवार्षिक निवडणूक- २०२६; जिल्हास्तरीय माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती कार्यान्वितBajaj Pune Grand Tour : बजाज पुणे ग्रँड टूरला UCI 2.1 श्रेणी; २६ ते ३१ जानेवारीदरम्यान सहा टप्प्यांची स्पर्धा

Neelam Gorhe : राजकारणाचे साहित्यात प्रतिबिंब उमटले पाहिजे- डॉ. नीलम गोऱ्हे

Neelam Gorhe : राजकारणाचे साहित्यात प्रतिबिंब उमटले पाहिजे- डॉ. नीलम गोऱ्हे

१० वे नांदी साहित्य संमेलन उत्साहात

marathinews24.com

सासवड – सामाजिक जीवन ज्यावेळी व्यक्त होते, तेथून साहित्याची निर्मिती होत असते. त्यामुळे राजकारण आणि साहित्य यांचा परस्परांशी जवळचा संबंध असून, आचार्य अत्रे यांच्या प्रमाणे राजकारणाचे प्रतिबिंब साहित्यात उमटले पाहिजे. साहित्याच्या माध्यमातून समाजातील प्रश्न, संघर्ष आणि अनुभव व्यक्त झाले पाहिजेत, असे प्रतिपादन शिवसेना नेत्या, महाराष्ट्र विधान परिषदेच्या माजी उपसभापती व विद्यमान सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी केले.

व्यापाऱ्यांसाठी कल्याण आयोगासह सामाजिक सुरक्षा योजना लागू करा – सविस्तर बातमी 

महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, समर्थ युवा फौंडेशन, आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, पुरंदर तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सासवड, सोपाननगर आणि जेजुरी शाखांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (१ ऑक्टोबर) दहावे नांदी साहित्य संमेलन ‘राजकीय साहित्य संमेलन’ म्हणून आयोजित करण्यात आले. या संमेलनाच्या अध्यक्षपदावरून डॉ. गोऱ्हे बोलत होत्या.

राजकारणातील विविध विषयांवर भाष्य करताना साहित्य, इतिहास आणि सांस्कृतिक परंपरांची माहिती असणे आवश्यक आहे, असे सांगून डॉ. गोऱ्हे (Neelam Gorhe) म्हणाल्या, “राजकारणात काम करणाऱ्या व्यक्ती वेगवेगळ्या असल्या, तरी राजकीय साहित्य हा व्यापक विषय आहे. कायदे, ठराव, मसुदे आणि निर्णय घेताना समाजाची पार्श्वभूमी समजून घेणे गरजेचे असते. त्यामुळे राजकारणाशी संबंधित प्रत्येक बाबीला साहित्याचा आणि सर्जनशीलतेचा स्पर्श असतो.”

लोकांच्या संघर्षातून साहित्य आणि लोकगीते जन्माला येतात, असे नमूद करत त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील साहित्यिक योगदानाचा संदर्भ दिला. शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे यांच्या लेखनातून आणि लोकगीतांतून समाजातील संघर्ष प्रभावीपणे व्यक्त झाल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेच्या लेखनातून वैचारिक साहित्याची निर्मिती केली, तसेच वि. स. पागे यांच्या विधिमंडळावरील लेखनातून मराठी भाषेचे वेगळेपण आणि समृद्धी दिसून येते, असेही डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.

राजकीय नेत्यांच्या लेखनपरंपरेचा उल्लेख करताना डॉ. गोऱ्हे यांनी अटल बिहारी वाजपेयी, प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण यांच्यासह पत्रकारितेतून राजकीय क्षेत्रात आलेल्या विविध व्यक्तींचा संदर्भ दिला. यशवंतराव चव्हाण यांच्या आत्मचरित्रातून महाराष्ट्राचा इतिहास आणि तत्कालीन सामाजिक-राजकीय वास्तवाचे दर्शन घडते, असे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.

आचार्य अत्रे आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या परस्परांतील वैचारिक संघर्षाच्या आठवणी सांगताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, त्यांच्या वक्तव्यांमध्ये तीव्रता असली तरी त्यामध्ये आपलेपणा होता. “मतभेद असले तरी मनभेद होता कामा नये,” हा संदेश त्यांनी यावेळी दिला. आज समाजमाध्यमांवर वापरली जाणारी भाषा ही अनेकदा माणसाचा माणसावरील विश्वास कमी करणारी ठरत आहे. त्यामुळे चांगले साहित्य लिहिणाऱ्या व्यक्तींवरही काही प्रमाणात बंधने निर्माण होत आहेत. समाजमाध्यमांवरील भाषा आणि वर्तन याबाबत गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. साहित्याच्या निमित्ताने संवाद वाढला पाहिजे आणि मतभेदांपलीकडे संवादाचे पूल टिकले पाहिजेत, असे आवाहन डॉ. गोऱ्हे यांनी केले.

मराठी भाषेचे संवर्धन करणारी प्रतिनिधी म्हणून आपण या संमेलनात सहभागी झाल्याचे सांगत त्यांनी नागरिकांनी विविध प्रकारचे साहित्य वाचावे, असे आवाहन केले. राजकीय नेत्यांना लेखनासाठी स्वतंत्र वेळ मिळत नसला, तरी त्यांच्या भाषणांमध्ये त्यांच्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनातील अनुभव प्रतिबिंबित होत असतात, असेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. संमेलनादरम्यान महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे विभागाचे प्रमुख राजन लाखे यांनी डॉ. गोऱ्हे यांची मुलाखत घेतली. कुटुंब आणि सामाजिक जीवनाची सांगड घालताना एकमेकांशी संवाद साधणे महत्त्वाचे आहे. समाजातील प्रत्येक अनुभव मुलांना अधिक परिपक्व बनवत असतो, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

लेखनाची प्रेरणा कुठून मिळाली, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी, आपल्या आत्या विजया जहागीरदार आणि पणजोबा हे उत्तम लेखक असल्याचे सांगितले. शालेय जीवनापासूनच वाचनाचा संस्कार झाल्याने लेखनाकडे वळल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले. वयाच्या १९व्या वर्षी लिहिलेल्या कथेला उत्कृष्ट कथा पुरस्कार मिळाल्यानंतर लेखनाचा प्रवास पुढे सुरू राहिला. त्यानंतर अनेक कथा, कादंबऱ्या आणि कवितांचे लेखन केल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

हुंडाबळी आणि महिलांवरील अत्याचाराच्या प्रश्नावर बोलताना डॉ. गोऱ्हे यांनी पीडित महिलांना समुपदेशन व आधार देण्यासाठी स्त्री आधार केंद्राद्वारे विविध महिला गटांच्या माध्यमातून काम सुरू असल्याचे सांगितले. पीडित मुलीच्या पाठीशी तिचे आई-वडील आणि भाऊ यांनी ठामपणे उभे राहणे अत्यंत आवश्यक आहे, असे डॉ. गोऱ्हे Neelam Gorhe यांनी स्पष्ट केले.

आजच्या स्त्रियांनी विविध क्षेत्रांत काम करताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सातत्याने काम करावे. वेळेचा उपयोग कामासाठी करावा आणि स्वतःला स्वतःच सावरण्याची ताकद निर्माण करावी, असा संदेश डॉ. गोऱ्हे Neelam Gorhe यांनी दिला. प्रत्येक वेळी कोणीतरी मदत करेल, अशी अपेक्षा न ठेवता महिलांनी आत्मनिर्भर आणि सक्षम होण्यावर भर द्यावा. मदतीचा हात पुढे करणारे प्रत्येकजण निःस्वार्थ असेलच असे नाही, त्यामुळे महिलांनी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे महत्त्वाचे असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष व संमेलनाचे उद्घाटक योगेश सोमण यांनी शंभराव्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आजवर ज्या ठिकाणी साहित्य संमेलने झाली आहेत, त्या ठिकाणी नांदी संमेलन आयोजित करण्याचा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. विविध विषयांवर आधारित कार्यक्रमांच्या माध्यमातून साहित्य संमेलनाची व्यापक माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याचे सोमण यांनी नमूद केले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह सुनील महाजन, संमेलनाचे स्वागताध्यक्ष विजय कोलते, सासवड नगरपालिका नगराध्यक्ष श्रीमती आनंदी जगताप, मासाप सासवड शाखेचे अध्यक्ष ऍड दिलीप निरगुडे, प्राचार्य धनाजी नागणे, प्रा. डॉ. नानासाहेब पवार, डॉ. नारायण टाक, शांताराम पोमण, ऍड प्रकाश अण्णा खाडे, युसूफ सय्यद, नंदकुमार सागर, प्रा. संदीप टिळेकर, शिवसेना महिला आघाडीच्या अंजली गाडे, ज्योती वाघमारे उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×