सायबर चोरट्यांची ऑनलाईन बनवेगिरी

मोबाईल हॅक करून महिलेला पावणेसहा लाखांचा गंडा

इ-मेल हॅक करून ९ लाखांचा गंडा

marathinews24.com

पुणे – सायबर चोरट्यांनी पुणेकरांना वेठीस धरले असून, विविध आमिषांसह आता इ-मेल हॅकिंगद्वारेही ऑनलाईन लुट केली जात आहे. त्यामुळे रस्त्यावरील चोरट्यांपेक्षा ऑनलाईनरित्या होणार्‍या चोरीची भीती अनेकांच्या मनात आहे. विशेषतः उच्च शिक्षितांना टारगेट करून त्यांच्याकडून ऑनलाईन व्यवहाराची माहिती काढून फसवणूक केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनो अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे, अन्यथा बँकखाते रिकामे झाल्यानंतर पश्चातापाची वेळ तुमच्यावर ओढावू शकते.

ग्रामरोजगार सेवकास गाव गुडांनी केली बेदम मारहाण – सविस्तर बातमी

बँकिंग व्यवहारासाठी वापरात असलेला इ-मेल आयडीसह पासवर्ड हॅक करून सायबर चोरट्याने एकाची ८ लाख ५१ हजारांची ऑनलाईन फसवणुक केली आहे. ही घटना २४ फेबु्रवारी २०२४ मध्ये घडली आहे. याप्रकरणी मुंढव्यात राहणार्‍या ५८ वर्षीय नागरिकाने मुंढवा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार बँक खातेधारकासह वापरकर्त्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे मुंढव्यात राहायला असून, २४ फेबु्रवारी २०२४ रोजी सायबर चोरट्यांनी त्यांच्या बँकिंग व्यवहारासाठी वापरातील इ-मेलची माहिती मिळविली. त्यानंतर संबंधित इ-मेलसह पासवर्ड हॅक केले. त्याद्वारे वेळोवेळी रक्कम काढून घेत तब्बल ८ लाख ५१ हजारांची फसवणूक केली. याप्रकरणाची माहिती झाल्यानंतर तक्रारदाराने पोलीस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×