ग्रामरोजगार सेवकास गाव गुडांनी केली बेदम मारहाण

राजकीय दबावापोटी गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ; गेवराई तालुक्यातील नादलगाव येथील घटना

marathinews24.com

बीड : (अनंत जाधव)- आदिवासी समाजातील ग्रामरोजगार सेवकाला जातिवाचक शिवीगाळ करून गावातील काही गावगुंडानी बेद म मारहाण केल्याची घटना दिनांक ६ डिसेंबरला सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास नादलगाव याठिकाणी घडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात वर्दीचा धाक आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सासरच्या मंडळींनी केला छळ; गुन्हा दाखल – सविस्तर बातमी

जालिंदर सुरवसे ( वय ३५ ) यांना घरात शिरून मारहाण करण्यात आली आहे. अश्रुबा उत्तम राऊत, गोविंद सखाराम राऊत, भगवान अश्रुबा राऊत, विष्णू अश्रुबा राऊत याच्यासह गावातील काही गुडांनी जालिंदर सुरवसे यांना घरातून बाहेर ओढून तु लय माजलास , तुला आम्ही सोडणार नाहीत, जिवे मारून टाकू तुझ्या कुटूंबाला गावात राहू देणार नाहीत अशा धमक्या देत जातिवाचक शिविगाळ केली. त्यांना दुचाकीला बांधून गावातील चौकात ओढत नेऊन लाथाबुक्यानी, लोंखडी रॅाडने मारहाण करून खिश्यातील ५० हजार रूपये , मोबाईल चोरून नेला. गावातील १० ते १२ गुंडानी त्यांना मारहाण केली आहे.

सुरवसे यांची बहिण उषा सांळूके आणि आई तलवाडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्या होत्या. त्यांना पोलिसांनी राजकिय दबावापोटी तक्रार न घेता बाहेर काढल्याचा आरोप कुटूंबियांनी केला आहे. दरम्यान, पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी या प्रकरणात लक्ष घालून संबधित गावगुडांवर कारवाई करून संबंधित अदिवासी कुटूबाला न्याय देण्याची मागणी होत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×