Breking News
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावलेHadapsar Dog Death Case : हडपसरमध्ये मारहाणीत भटक्या श्वानाचा मृत्यूPune Public Drinking Assault Case : दारु पिण्यास मनाई केल्याने तिघांना मारहाणpune molestation case : महिलेचा विनयभंग; पुण्यात माजी पोलीस अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल14 Women Sexual Exploitation Case : धक्कादायक….लग्नाच्या आमिषाने तब्बल १४ महिलांचे लैंगिक शोषणSTEP Skill Training Maharashtra : अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमाचे ‘संत रोहिदास अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम’ असे नामकरण : मंत्री मंगल प्रभात लोढाMission Lakshvedh Maharashtra : ‘मिशन लक्षवेध’आणि बालेवाडी क्रीडा संकुलाच्या विकासकामांचा आढावाAmitesh Kumar Pune : तर बंदोबस्तासाठी १०० अमलदार देतो – पोलीस आयुक्त अमितेश कुमारGift of Education Pune : ‘गिफ्ट ऑफ एज्युकेशन’ अंतर्गत १०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी पुढाकार

Pimpri Chinchwad RTO : पिंपरी-चिंचवड आरटीओमध्ये दुचाकींसाठी नवीन NW मालिका

Pimpri Chinchwad RTO

आकर्षक व पसंतीचे क्रमांक आरक्षित करण्यासाठी ३० ऑक्टोबरला अर्ज करण्याचे आवाहन

marathinews24.com

पुणे – Pimpri Chinchwad RTO : प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड येथे दुचाकी वाहनांसाठी लवकरच NW ही नवीन नोंदणी मालिका सुरू करण्यात येणार आहे. या मालिकेतील आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक विहित शुल्काच्या तीनपट शुल्क भरून आरक्षित करण्यासाठी इच्छुकांनी ३० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २.३० या वेळेत विहित नमुन्यात अर्ज करावेत.

दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – सविस्तर बातमी 

दुचाकी मालिकेतील उर्वरित आकर्षक क्रमांकांसाठी २ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २.३० या वेळेत अर्ज स्वीकारण्यात येतील. चारचाकी वाहनांसाठीची अर्जदारांची यादी २ नोव्हेंबर रोजी, तर दुचाकी वाहनांसाठीची यादी ३ नोव्हेंबर रोजी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येईल. (Pimpri Chinchwad RTO) अधिक रकमेची बोली लावण्यासाठी संबंधितांनी अनुक्रमे २ व ३ नोव्हेंबर रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत सीलबंद पाकिटात डिमांड ड्राफ्ट जमा करावा. त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता बोली प्रक्रिया पार पडेल.

अर्जासोबत डिमांड ड्राफ्ट, पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, फोटो ओळखपत्र व पॅनकार्ड यांच्या साक्षांकित प्रती आणि आधारकार्डशी संलग्न मोबाईल क्रमांक देणे आवश्यक आहे. डिमांड ड्राफ्ट ‘DY.R.T.O. PIMPRI CHINCHWAD’ यांच्या नावे पुणे येथील राष्ट्रीयीकृत किंवा अनुसूचित बँकेचा असावा. आरक्षित नोंदणी क्रमांक बदलता येणार नाही. क्रमांक आरक्षित केल्यापासून १८० दिवसांत वाहन नोंदणीसाठी सादर न केल्यास आरक्षण रद्द होईल व भरलेले शुल्क शासन जमा होईल. आरक्षणासाठी भरलेले शुल्क परत मिळणार नाही, असे प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड यांच्याकडून कळविण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×