पुण्यात महिला उमेदवारांच्या चिमुकल्यांसाठी पोलीस बनले पालक

पुण्यात महिला उमेदवारांच्या चिमुकल्यांसाठी पोलीस बनले पालक

पोलीस भरतीसाठी दिले प्राधान्य, निवारा अन बिस्कीटही

marathinews24.com

पुणे – पोलीस भरतीसाठी लहान बाळ सोबत घेउन येणार्‍या महिला उमेदवारांच्या चिमुकल्यांसाठी पुणे पोलीस दल पालक बनले आहे. संबंधित उमेदवारांच्या मुलांची काळजी घेउन त्यांना विविध चाचण्यांसाठी सर्वात पुढे प्राधान्य दिले आहे. त्यामुळे महिला उमेदवारांनी पुणे पोलिसांच्या प्रशासनाच्या नियोजनाचे कौतुक करीत आभार मानले आहे. दरदिवशी साधारणपणे ५० ते ६० लहान मुलांना घेउन महिला उमेदवार शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात येत आहेत.

गुरु तेग बहादुर सिंह यांच्या ३५० व्या शहीद महोत्सवानिमित्त पुण्यात चित्ररथाचे स्वागत – सविस्तर बातमी  

पुणे पोलीस दलासाठी उमेदवारांची भरती प्रक्रिया सुरू झाली असून, दरदिवशी साधारणतः ३ हजारांवर महिलांना धावण्यासह इतर चाचण्यांसाठी बोलावण्यात येत आहे. दरदिवशी ५० ते ६० महिला आपल्या लहान चिमुरड्यांना सोबत घेउन आल्याचे दिसून आले. मात्र, धावताना, गोळाफेक करताना उशीर होउन मुलांची हेळसांड होउ शकते, यापार्श्वभूमीवर पुणे पोलीस प्रशासनाने चिमुकल्यांना आधार दिला आहे. भरतीवेळी मुलांसह येणार्‍या महिला उमेदवारांना नोंदणीकृत चिठ्ठी देउन त्यांना सर्वात पुढे बोलावले जाते. महिलांची ८०० मीटर धावणे, गोळाफेक, १०० मीटर धावण्याची चाचणी इतरांपेक्षा आधी पुर्ण केली जात आहे. त्यामुळे संबंधित महिलांना मुलांना वेळ देता येत आहे.

नातेवाईकांची सोय, मुलांना बिस्कीटे

पोलीस भरतीसाठी दरदिवशी ३ हजारांवर मुली-महिलांना पाचारण केले जाते. त्यामध्ये सोबत लहान मुलांना घेउन आलेल्या उमेदवारांच्या नातेवाईकांना पोलीस मुख्यालयात असलेल्या रिक्रेशन हॉलमध्ये बसण्याची सोय केली आहे. तसेच मुलांसाठी बिस्कीटे वितरित केली जात असून, मुलांची काळजी घेण्यासाठी महिला पोलीस अमलदारांना विशेष दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त संजय पाटील, उपायुक्त डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

सामाजिक संस्था, डॉक्टरांकडूनही सेवा

भरती प्रक्रियेत ८०० मीटर धावण्याआधी ग्लुकोस बिस्कीट, ग्लु कोंडी पावडर उपलब्ध केली आहे. धावून आल्यानंतर महिला उमेदवारांना बसण्यासाठी शामियाना उभारला आहे. त्यांना महिला हवालदार मदत करत आहेत. त्यासोबत शरीराची काळजी घेण्यासंदर्भात हर्डीकर रूग्णालयातील डॉक्टर अभय रैना हे मार्गदर्शन करणार आहे. तसेच एनजीओ मुलींना नाश्ता सोय करण्यात आली असून, दररोज ५०० पॅकेट नाश्ता दिला जात आहे.

पोलीस भरती प्रक्रियेत महिला उमेदवारांसह इतर उमेदवारांची विशेष काळजी घेतली जात आहे. त्यासोबत चाचणीसाठी सोबत लहान मुले घेउन येणार्‍या महिला उमेदवारांना विशेष प्राधान्य दिले आहे. त्यांना सर्वात आधी बोलावून घेत चाचणी पुर्ण केली जात आहे.

संजय पाटील, अपर पोलीस आयुक्त, प्रशासन, पुणे शहर

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×