Breking News
MPSC Protest Pune : ‘पुणे बंद करण्याची भूमिका घेत असाल तर पुणेकरच उत्तर देतील’; MPSC आंदोलनावर आमदार डावखरेंचा रोहित पवारांना सल्लाMPSC Protest: एमपीएससी आंदोलनाविरोधात जनहित याचिकाFarmers, Drought : दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूरPune Crime : पुण्याच्या ग्रामदैवताची दानपेटी फोडली, आरोपीला बेड्या630 Special Teachers Felicitation : दिव्यांग विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या विशेष शिक्षकांच्या कार्याचा गौरवVasundhara Pady Dindi : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘वसुंधरा पायी दिंडी’चे प्रस्थानDr Anil Dudhabhate Medical Award : ‘दृष्टीदूत’ डॉ. अनिल दुधभाते यांना मराठवाडा युवा मंचचा वैद्यकीय पुरस्कारSeva Sankalp Abhiyan : ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत बारामतीत महिला आरोग्य, अवयवदान व रक्तदानाबाबत जनजागृतीSonali Kulkarni : चित्रपटाविषयी प्रेक्षकांनी सम्यक प्रतल शोधणे आवश्यक-सोनाली कुलकर्णीPune Crime : भरदिवसा दुचाकीच्या डिक्कीतून दागिने चोरीला

Prithika Pradeep : आशियाई पदक विजेती प्रिथिका प्रदीपचा सत्कार

Prithika Pradeep : आशियाई पदक विजेती प्रिथिका प्रदीपचा सत्कार

ऑलिम्पिक पदकासाठी तयारी करण्याचे आवाहन

marathinews24.com

पुणे – आशियाई स्पर्धेत पदक मिळविणाऱ्या पुण्याच्या प्रिथिका प्रदीप (Prithika Pradeep) हिचा क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे विभागाचे उपसंचालक क्रीडा व युवक सेवा कार्यालय आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने चिखली येथील गणेश इंटरनॅशनल स्कूल येथे सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनीही प्रिथिका प्रदीप हिचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

‘दृष्टीदूत’ डॉ. अनिल दुधभाते यांना मराठवाडा युवा मंचचा वैद्यकीय पुरस्कार – सविस्तर बातमी 

सत्काराला उत्तर देताना प्रिथिका प्रदीप म्हणाली, “सातत्य आणि नियोजनबद्ध तयारीच्या माध्यमातून यश मिळविता येते. खेळाडूंनी ध्येय निश्चित करून त्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत.” क्रीडा व युवक सेवा विभागाचे उपसंचालक युवराज नाईक यांनी प्रिथिका प्रदीप हिचे अभिनंदन केले. ते म्हणाले, प्रिथिकाने Prithika Pradeep मिळविलेल्या यशामुळे देशाचे नाव उंचावले आहे. विद्यार्थ्यांनी व खेळाडूंनी तिचा आदर्श घेऊन क्रीडा क्षेत्रात प्रगती साधावी. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. खेळाडूंनी या योजनांचा लाभ घ्यावा. ‘मिशन लक्षवेध’सारख्या योजनांचा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीसाठी लाभ होऊ शकतो. शासनाकडून पात्र खेळाडूंना नोकरी तसेच विविध आर्थिक लाभ देण्यात येतात, असे त्यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवडचे उपायुक्त पंकज पाटील म्हणाले, खेळाडूंनी प्राथमिक स्तरापासूनच यशस्वी खेळाडूंचा आदर्श घेऊन आपल्या क्रीडा कामगिरीत सातत्याने सुधारणा करावी. क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त दीपक सिंगला यांनी प्रिथिका प्रदीप हिचे अभिनंदन करून तिने आगामी काळात ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. “ऑलिम्पिकचे ध्येय निश्चित करून तयारी करा. शासन खेळाडूंच्या पाठीशी आहे. पात्र खेळाडूंना शासनाच्या नियमानुसार नोकरी व विविध आर्थिक लाभ देण्यात येतात,” असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास संस्थेचे प्रमुख एस. बी. पाटील, समन्वयक शेवाळे, पिंपरी-चिंचवड क्रीडा विभागाचे प्रमुख कन्हेरे, क्रीडा अधिकारी शेख, कडूस, खो-खो संघटनेचे शिरीन गोडबोले, प्रिथिका प्रदीप हिचे प्रशिक्षक कुणाल तावरे तसेच क्रीडा विभागातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमात प्रभारी सहसंचालक संजय सबनीस, उपसंचालक उदय जोशी, उपसंचालक माणिक पाटील, सहाय्यक संचालक चंद्रशेखर साखरे, भाग्यश्री बिले, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे आदी मान्यवरांनीही प्रिथिका प्रदीप हिचे अभिनंदन केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×