Breking News
Pune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवलेPune Grand Tour 2027 : शेतीमालाच्या बाजारपेठांपासून पर्यटनापर्यंत नव्या संधी; ‘पुणे ग्रँड टूर’साठी ३९ ग्रामपंचायतींनी मांडला आभाराचा ठरावSahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावलेHadapsar Dog Death Case : हडपसरमध्ये मारहाणीत भटक्या श्वानाचा मृत्यूPune Public Drinking Assault Case : दारु पिण्यास मनाई केल्याने तिघांना मारहाणpune molestation case : महिलेचा विनयभंग; पुण्यात माजी पोलीस अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल14 Women Sexual Exploitation Case : धक्कादायक….लग्नाच्या आमिषाने तब्बल १४ महिलांचे लैंगिक शोषणSTEP Skill Training Maharashtra : अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमाचे ‘संत रोहिदास अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम’ असे नामकरण : मंत्री मंगल प्रभात लोढा

Pune Chain Snatching : पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी सोनसाखळी हिसकावणार्‍या दोघांना बेड्या, ६ गुन्हे उघडकीस

Pune Chain Snatching

स्थानिक गुन्हे शाखा, दौंड पोलिसांची कारवाई

marathinews24.com

पुणे – जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांच्या सोनसाखळी हिसकावणार्‍या दोघांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेसह दौंड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ६ गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून, ५५ ग्रॅम सोन्याचे दागिने, दुचाकी असा ९ लाखांचा ऐवज जप्त केला आहे. दीपक बळभीम पवार (वय २८, रा. आरोळे वस्ती, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) युवराज सचिन लोखंडे (वय २४, रा. उध्दट, इंदापूर, जि. पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे असून, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

मतदार यादीवरील दावे व हरकती दाखल करण्यास २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ* – सविस्तर बातमी 

दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरीची घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची बैठक घेतली. मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळ, गुन्ह्याची वेळ, कार्यपद्धती आणि संशयितांची माहिती यांचा अभ्यास करून तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपींनी दौंड, यवत, वडगाव निंबाळकर, जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे केल्याचे उघडकीस आले. यामध्ये दौंड आणि यवत पोलीस ठाण्यातील प्रत्येकी दोन, वडगाव निंबाळकर आणि जेजुरी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एका गुन्ह्याचा समावेश आहे.

तपास पथकाला आरोपी जामखेड मधील आरोळे वस्तीवर राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून दीपक पवार आणि युवराज लोखंडे यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, तब्बल ६ गुन्हे उघडकीस आणले आहेत. ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूसाहेब घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर राउत, उपनिरीक्षक शंकर वाघमारे, सचिन घाडगे, आसिफ शेख, गुरुनाथ गायकवाड, सुभाष राउत, विकास कापरे, भारत मोहोळ, चेतन पाटील, अंतुल पठाण, अंकुश दळवी यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×