Breking News
MPSC Protest Pune : ‘पुणे बंद करण्याची भूमिका घेत असाल तर पुणेकरच उत्तर देतील’; MPSC आंदोलनावर आमदार डावखरेंचा रोहित पवारांना सल्लाMPSC Protest: एमपीएससी आंदोलनाविरोधात जनहित याचिकाFarmers, Drought : दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूरPune Crime : पुण्याच्या ग्रामदैवताची दानपेटी फोडली, आरोपीला बेड्या630 Special Teachers Felicitation : दिव्यांग विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या विशेष शिक्षकांच्या कार्याचा गौरवVasundhara Pady Dindi : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘वसुंधरा पायी दिंडी’चे प्रस्थानDr Anil Dudhabhate Medical Award : ‘दृष्टीदूत’ डॉ. अनिल दुधभाते यांना मराठवाडा युवा मंचचा वैद्यकीय पुरस्कारSeva Sankalp Abhiyan : ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत बारामतीत महिला आरोग्य, अवयवदान व रक्तदानाबाबत जनजागृतीSonali Kulkarni : चित्रपटाविषयी प्रेक्षकांनी सम्यक प्रतल शोधणे आवश्यक-सोनाली कुलकर्णीPune Crime : भरदिवसा दुचाकीच्या डिक्कीतून दागिने चोरीला

Pune Crime : भरदिवसा दुचाकीच्या डिक्कीतून दागिने चोरीला

 Shaniwar Peth Burglary

फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानावरील घटना

marathinews24.com

पुणे – Pune Crime : दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेले ८० हजारांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरुन नेले. ही घटना ४ ऑक्टोबरला दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानावर घडली आहे. याप्रकरणी कात्रज परिसरात राहणार्‍या ३७ वर्षीय तरुणाने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घराचे कुलूप तोडून पावणेदोन लाखांचा ऐवज चोरी – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण कात्रज परिसरात राहायला असून, ४ ऑक्टोबरला दुपारी ते फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानावर खेळण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी ८० हजारांचे सोन्याचे दागिने दुचाकीच्या डिक्कीत काढून ठेवले होते. चोरट्यांनी त्यांच्या दुचाकीची डिक्की उघडून दागिन्यांची चोरी केली. खेळून आल्यानंतर तक्रारदाराला दागिन्यांची चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस अमलदार शिंदे तपास करीत आहेत.

जेष्ठाच्या मोबाइलचा घेतला ताबा, ५ लाख गायब

Pune Crime : जेष्ठ नागरिकाच्या मोबाइलचा ताबा घेउन सायबर चोरट्यांनी त्यांच्या बँकखात्यातील ५ लाख २६ हजार रुपये ऑनलाईनरित्या इतर खात्यात वर्ग करुन फसवणूक केली आहे. ही घटना ४ ऑक्टोबरला संध्याकाळी सव्वा चारच्या सुमारास आंबेगाव परिसरात घडली आहे. याप्रकरणी ६६ वर्षीय जेष्ठाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञातासह बँक खातेधारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे जेष्ठ नागरिक असून, आंबेगाव परिसरात राहायला आहेत. ४ ऑक्टोबरला दुपारी चारच्या सुमारास सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलचा ऑनलाईनरित्या ताबा घेतला. तक्रारदाराच्या बँक खात्यातील ५ लाख २६ हजारांची रक्कम दुसर्‍या बँक खात्यात वर्ग केली. बँकेतून रक्कम कमी झाल्याचा मेसेज आल्यानंतर जेष्ठाला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर जेष्ठाने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक संतोष जाधव तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×