Breking News
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावलेHadapsar Dog Death Case : हडपसरमध्ये मारहाणीत भटक्या श्वानाचा मृत्यूPune Public Drinking Assault Case : दारु पिण्यास मनाई केल्याने तिघांना मारहाणpune molestation case : महिलेचा विनयभंग; पुण्यात माजी पोलीस अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल14 Women Sexual Exploitation Case : धक्कादायक….लग्नाच्या आमिषाने तब्बल १४ महिलांचे लैंगिक शोषणSTEP Skill Training Maharashtra : अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमाचे ‘संत रोहिदास अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम’ असे नामकरण : मंत्री मंगल प्रभात लोढाMission Lakshvedh Maharashtra : ‘मिशन लक्षवेध’आणि बालेवाडी क्रीडा संकुलाच्या विकासकामांचा आढावाAmitesh Kumar Pune : तर बंदोबस्तासाठी १०० अमलदार देतो – पोलीस आयुक्त अमितेश कुमारGift of Education Pune : ‘गिफ्ट ऑफ एज्युकेशन’ अंतर्गत १०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी पुढाकार

Pune Crime News : ज्येष्ठ नागरिकाकडे बतावणी करुन सोन्याची अंगठी चोरली

Beed Theft News

धनकवडीतील घटना

marathinews24.com

पुणे – मंदिरात दर्शन घेऊन निघालेल्या ज्येष्ठ नागरिकाकडे बतावणी करुन चोरट्यांनी त्यांच्याकडील ५० हजार रुपयांची सोन्याची अंगठी चोरुन नेल्याची घटना धनकवडी परिसरात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६७ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे धनकवडी परिसरात राहायला आहेत. ते दररोज धनकवडीतील श्री विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी जातात. २६ ऑक्टोबर रोजी ते नेहमीप्रमाणे दर्शनासाठी गेले. दुपारी मंदिरातून दर्शन घेऊन निघालेल्या तक्रारदाराला चोरट्यांनी अडविले. ‘मंदिरासाठी आम्हाला पाच हजार रुपयांची देणगी द्यायची आहे. तुमच्याकडील सोन्याची अंगठी आम्हाला द्या. ही अंगठी आम्ही देणगीपोटी देण्यात आलेल्या रक्कमेला लावणार आहोत. आत्मशुद्धीकरणासाठी अंगठी हवी आहे‘, अशी बतावणी चोरट्यांनी त्यांच्याकडे केली.

त्यानंतर चोरट्यांनी त्यांना बोलण्यात गुंतविले. त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्यांंनी अंगठी घेतली. चोरट्यांनी कागदात अंगठी बांधून देण्याचा बहाणा केला. अंगठीऐवजी चोरट्यांनी कागदात दगड ठेवला. त्यानंतर चोरटे दुचाकीवरुन पसार झाले. ज्येष्ठ नागरिकाने काही वेळानंतर चोरट्यांनी दिलेला कागदाची पुडी उघडून पाहिली. तेव्हा कागदात छोटा दगड ठेवल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, पोलीस हवालदार तडवी तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×