Breking News
Sahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावलेHadapsar Dog Death Case : हडपसरमध्ये मारहाणीत भटक्या श्वानाचा मृत्यूPune Public Drinking Assault Case : दारु पिण्यास मनाई केल्याने तिघांना मारहाणpune molestation case : महिलेचा विनयभंग; पुण्यात माजी पोलीस अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल14 Women Sexual Exploitation Case : धक्कादायक….लग्नाच्या आमिषाने तब्बल १४ महिलांचे लैंगिक शोषणSTEP Skill Training Maharashtra : अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमाचे ‘संत रोहिदास अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम’ असे नामकरण : मंत्री मंगल प्रभात लोढाMission Lakshvedh Maharashtra : ‘मिशन लक्षवेध’आणि बालेवाडी क्रीडा संकुलाच्या विकासकामांचा आढावाAmitesh Kumar Pune : तर बंदोबस्तासाठी १०० अमलदार देतो – पोलीस आयुक्त अमितेश कुमार

Pune Election News : पुणे विभाग पदवीधर व पुणे विभाग शिक्षक मतदार संघांच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

Pune Election News

मतमोजणी प्रक्रिया अधिकारी- कर्मचाऱ्यांनी समन्वयाने अचूक, शांततेत यशस्वी करावी-विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले

marathinews24.com

पुणे – Pune Election News : विधान परिषदेसाठी होणाऱ्या पुणे विभाग पदवीधर व पुणे विभाग शिक्षक मतदार संघांच्या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया नियुक्त सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांनी समन्वयाने अचूक, शांततेत आणि ताणरहित पद्धतीने यशस्वी करावी, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिले.

‘प्रतिध्वनी’ पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन; ‘स्मृतींचा मागोवा’ मैफिलीने रसिकांना मंत्रमुग्ध केले – सविस्तर बातमी 

पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघांची मतमोजणी मंगळवार २७ ऑगस्ट रोजी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडीच्या बॅडमिंटन हॉलमध्ये होणार आहे. या अनुषंगाने मतमोजणी कक्षात मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. (Pune Election News) या प्रशिक्षणास विभागातील पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी श्रीमती तेली- उगले म्हणाल्या, मतदान अधिकारी- कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करण्याचे काम केले आहे. मतमोजणीच्या फेरीदरम्यान शांततेत, चूक होऊ न देता आणि कोणतेही दडपण न घेता काम करावे. व्यवस्थित सर्व नमुने भरून संबंधित पथकाकडे जमा करावेत. नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना आवश्यक तेथे मार्गदर्शन, मदत देण्यात येईल. मतपत्रिका वैध अवैध बाबतचे मुद्दे, आक्षेप योग्यरित्या निकाली काढावेत.

मतपत्रिकांवरील पसंतीक्रमानुसार मतमोजणीची प्रक्रिया असल्याने प्रत्येक टप्प्यावर विशेष काळजी घ्यावी. प्रत्येक टेबलवरील पथकाने काळजीपूर्वक आणि अचूक काम करावे. प्रत्येकाने आपापली जबाबदारी योग्यरित्या पार पाडावी. मतमोजणी प्रक्रियेत टेबलवरील पर्यवेक्षक, सहायक, संबंधित अधिकारी आणि माहिती संकलन करणाऱ्या पथकांमध्ये समन्वय असणे आवश्यक असल्याचे श्रीमती तेली-उगले यांनी सांगितले.

निवडणूक कामकाजासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणादरम्यान आपल्या शंकांचे निरसन करून घ्यावे. मतमोजणीच्या दिवशी कोणतीही संदिग्धता राहू नये, यासाठी आवश्यक नियम, सूचना आणि कार्यपद्धतींचा अभ्यास करावा, असेही त्या म्हणाले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी तथा महाऊर्जाचे अतिरिक्त महासंचालक अरुण आनंदकर यांनी शिक्षक मतदार संघातील मतमोजणी अधिकारी कर्मचाऱ्यांना आणि सह आयुक्त संजय पलांडे यांनी पदवीधर मतदार संघातील अधिकाऱ्यांना मतमोजणीशी संबंधित बाबींचे सविस्तर प्रशिक्षण दिले. मत मोजणी प्रक्रियेत सहभागी अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या शंकांचे श्री. पलांडे व श्री. आनंदकर यांनी निरसन केले.

यावेळी मतमोजणीची प्रक्रिया निर्धारित नियमांनुसार, वेळेत आणि काटेकोरपणे पार पाडण्याच्या दृष्टीने प्रशिक्षणात विविध बाबी स्पष्ट करण्यात आल्या. मतपेट्या उघडणे, ५० मतपत्रिकांचे गठ्ठे तयार करणे, भरायचे विविध नमुने, मतपत्रिका वैध, अवैध अचूक वर्गीकरण करणे, प्रत्येक फेरीनुसार निकाल नमुना जमा करणे आदींसह मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया यांचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण देण्यात आले. मतमोजणीसाठी करण्यात आलेल्या सर्व सुविधा व नियोजनाची माहिती यावेळी देण्यात आली.

अशी होणार मतमोजणी

पदवीधर मतदार संघाच्या मतमोजणीसाठी १०० टेबल असणार आहेत. यासाठी ५ कक्षात प्रत्येकी १० टेबलच्या २ रांगा अशी व्यवस्था करण्यात आली आहे. शिक्षक मतदार संघाच्या मतमोजणीसाठी ४२ टेबल असणार आहेत. यासाठी ३ कक्षात प्रत्येकी ७ टेबलच्या २ रांगा अशी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक, दोन मतमोजणी सहायक आणि एक शिपाई असा कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यात आला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×