Breking News
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावलेHadapsar Dog Death Case : हडपसरमध्ये मारहाणीत भटक्या श्वानाचा मृत्यूPune Public Drinking Assault Case : दारु पिण्यास मनाई केल्याने तिघांना मारहाणpune molestation case : महिलेचा विनयभंग; पुण्यात माजी पोलीस अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल14 Women Sexual Exploitation Case : धक्कादायक….लग्नाच्या आमिषाने तब्बल १४ महिलांचे लैंगिक शोषणSTEP Skill Training Maharashtra : अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमाचे ‘संत रोहिदास अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम’ असे नामकरण : मंत्री मंगल प्रभात लोढाMission Lakshvedh Maharashtra : ‘मिशन लक्षवेध’आणि बालेवाडी क्रीडा संकुलाच्या विकासकामांचा आढावाAmitesh Kumar Pune : तर बंदोबस्तासाठी १०० अमलदार देतो – पोलीस आयुक्त अमितेश कुमारGift of Education Pune : ‘गिफ्ट ऑफ एज्युकेशन’ अंतर्गत १०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी पुढाकार

Pune Growth Hub Development Plan : पुणे ग्रोथ हबच्या विकास आराखड्याचा उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून आढावा

Pune Growth Hub Development Plan

नोव्हेंबरअखेर बृहद् आराखडा केंद्र शासनाकडे सादर करणार; पहिल्या टप्प्यात पाच हजार कोटींच्या निधीची मागणी

marathinews24.com

पुणे – Pune Growth Hub Development Plan : पुणे महानगर प्रदेशाचा सर्वांगीण विकास करून पुण्याला जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘पुणे ग्रोथ हब’ उपक्रमाच्या विकास आराखड्याचा उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला.

एचडीएफसी लाईफच्या ‘स्वाभिमान’ उपक्रमातून पुण्यात सामाजिक व पर्यावरणीय विकासाला चालना – सविस्तर बातमी 

या बैठकीत माजी मुख्य सचिव तथा सहाव्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ.नितीन करीर, विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त विजय सूर्यवंशी, (Pune Growth Hub Development Plan) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील उपस्थित होते.

नीती आयोगाच्या पुढाकाराने देशातील मुंबई, सुरत, वाराणसी आणि विशाखापट्टणम् या शहरांमध्ये ग्रोथ हब उपक्रम राबविण्यात येत असून, त्यामध्ये पुण्याचाही समावेश करण्यात आला आहे. यासाठी मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्र शासन, नीती आयोग आणि पुणे इंटरनॅशनल सेंटर यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या नियोजनासाठी स्थापन करण्यात आलेल्या समन्वय समितीची बैठक आज पार पडली.

पुणे महानगर प्रदेशातील औद्योगिक, माहिती तंत्रज्ञान, वाहन उद्योग, शिक्षण, विमान वाहतूक, आरोग्य, कृषी आणि संशोधन अशा विविध क्षेत्रांतील विकासाच्या संधी विचारात घेऊन हा आराखडा तयार करण्यात येत आहे. सर्व संबंधित विभागांच्या सूचना आणि प्रस्तावांचा विचार करून विकासाची दिशा निश्चित केली जात आहे.

येत्या नोव्हेंबरअखेर पुणे ग्रोथ हबचा बृहद् विकास आराखडा मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीमार्फत केंद्र शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात या प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून पाच हजार कोटी रुपयांचा निधी मिळावा, अशी मागणी करण्यात येणार आहे.

सन २०३६ पर्यंतच्या पुढील दहा वर्षांच्या कालावधीत या उपक्रमाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक अपेक्षित आहे. या गुंतवणुकीतून पुणे महानगर प्रदेशातील पायाभूत सुविधा, उद्योग आणि विविध क्षेत्रांचा विकास साधून पुण्याला जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याच्या दृष्टीने शासन प्रयत्नशील आहे, असे यावेळी नमूद करण्यात आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×