Breking News
Pune Hotel Prostitution Racket : पुण्यात हॉटेलमध्ये वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; दोन परराज्यातील महिलांची सुटकाPune Police News : पुण्यातील २० जणांची पोलीस सुरक्षा काढलीTheur Maharshi Kaundinya Rishi Ashram : थेऊरच्या पुरातन वैभवाची साक्ष देणारा महर्षी कौंडिण्यऋषी आश्रम प्रकाशझोतातPune Girl Child Birth Ratio : ‘मुलींच्या जन्माचे स्वागत घरातूनच व्हावे’; आईसोबत वडील आणि कुटुंबाचेही समुपदेशन करा-डॉ. नीलम गोऱ्हेRapido Bike Taxi Pune : पुणे जिल्ह्यात रॅपिडो बाइक टॅक्सीचा वापर टाळा; पुणे आरटीओचे नागरिकांना आवाहनMaharashtra Revenue Department : महात्मा जोतीराव फुले महसूल लोकअदालत अभियानPune Crime Branch Arrest : रेकॉर्डवरील आरोपी पोलिसांच्या जाळ्यातSwargate Bus Theft Case : एसटी प्रवासात गुंगीकारक गोळ्या खाण्यास देउन प्रवाशांची लुटPune Police Farmer Aid : खाकीचा बळीराजाला आधार; पुणे पोलीस देणार ३ कोटी रुपयेEach Woman Champion Maharashtra : महाराष्ट्रातील ३५ हजार महिला उद्योजिकांना सक्षम करण्याचे उद्दिष्ट

Pune Hotel Prostitution Racket : पुण्यात हॉटेलमध्ये वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; दोन परराज्यातील महिलांची सुटका

Pune Hotel Prostitution Racket

आसाममधील तिघांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – Pune Hotel Prostitution Racket : शहरातील संगमवाडी परिसरातील हॉटेलमध्ये एजंटांमार्फत परराज्यांतील महिलांना आणून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याचा प्रकार गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (एएचटीयू) उघडकीस आणला. या कारवाईत दोन परराज्यांतील पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, आसाममधील तिघांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील २० जणांची पोलीस सुरक्षा काढली – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमवाडी बंडगार्डन रोडवरील एक्साइज कॉलनीजवळ असलेल्या ‘हॉटेल क्राउन प्लाझा’मध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिस निरीक्षक आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने बनावट ग्राहकाच्या मदतीने माहितीची खातरजमा केली. त्यानंतर हॉटेलवर अचानक छापा टाकला. कारवाईत वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या दोन परराज्यांतील महिलांची सुटका करण्यात आली.

रोहन ऊर्फ राजकुमार (वय ३२), विवेक ऊर्फ मयंक कबीर (वय ३४), विक्रम ऊर्फ पियुष (वय ३४, तिघेही रा. आसाम) आणि त्यांचा अन्य एक साथीदार अशा चौघांविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम १४३(१)(३), ३(५) तसेच अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ च्या कलम ४ व ५ नुसार कारवाई करण्यात आली आहे. (Pune Hotel Prostitution Racket)  ही कारवाई अपर पोलिस आयुक्त तेजस्वी सातपुते, उपायुक्त गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आशालता खापरे, सहायक निरीक्षक सोनाली जगदाळे/साठे, ईश्वर आंधळे, बबनराव केदार, अमेय रसाळ, अविनाश कोंढे, किशोर भुजबळ, सुरेखा आंधळे, मनीषा वायसे, फराह पठाण, वैशाली खेडेकर आणि वैशाली इंगळे यांच्या पथकाने केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×