Breking News
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावलेHadapsar Dog Death Case : हडपसरमध्ये मारहाणीत भटक्या श्वानाचा मृत्यूPune Public Drinking Assault Case : दारु पिण्यास मनाई केल्याने तिघांना मारहाणpune molestation case : महिलेचा विनयभंग; पुण्यात माजी पोलीस अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल14 Women Sexual Exploitation Case : धक्कादायक….लग्नाच्या आमिषाने तब्बल १४ महिलांचे लैंगिक शोषणSTEP Skill Training Maharashtra : अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमाचे ‘संत रोहिदास अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम’ असे नामकरण : मंत्री मंगल प्रभात लोढाMission Lakshvedh Maharashtra : ‘मिशन लक्षवेध’आणि बालेवाडी क्रीडा संकुलाच्या विकासकामांचा आढावाAmitesh Kumar Pune : तर बंदोबस्तासाठी १०० अमलदार देतो – पोलीस आयुक्त अमितेश कुमारGift of Education Pune : ‘गिफ्ट ऑफ एज्युकेशन’ अंतर्गत १०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी पुढाकार

Pune Investment Fraud : फॉरेक्स, क्रिप्टोच्या आमिषाने १४ कोटी ७० लाखांचा गंडा

Pune Investment Fraud

‘बोट ब्रो’च्या नावाखाली महाराष्ट्रभर फसवणूक

marathinews24.com

पुणे -Pune Investment Fraud : एआय बॉट ट्रेडिंग आणि क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा ६ ते ५० टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल, असे आमिष दाखवून पुण्यासह महाराष्ट्रातील नागरिकांना तब्बल १४ कोटी ७० लाख ९७ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ‘बोट ब्रो’ आणि तिच्याशी संबंधित कंपन्यांच्या माध्यमातून ही फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी दुबईत वास्तव्यास असलेल्या मुख्य सूत्रधारासह प्रमोटर्स आणि संबंधित कंपन्यांच्या संचालक मंडळातील सदस्य अशा २३ जणांविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

फटाके विक्रीसाठी परवानगी आवश्यक; २ नोव्हेंबरपूर्वी करा अर्ज – सविस्तर बातमी 

या प्रकरणात लवीश चौधरी ऊर्फ नवाब अली, विजय नारायण नायडू, राजनंदिनी नायडू, कुणाल खेडेकर, वैशाली खेडेकर, उमेश जरग, ज्ञानेश्वरी जरग, साहील धुमाळ, समीर काटे, शैलेश कणव, प्रमोद कदम, भरतकुमार सोलंकी, पोपट चोरगे आणि ललित प्रजापती यांच्यासह संबंधित कंपन्यांच्या संचालक मंडळातील सदस्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. प्रतीक चांगदेव भोसले (वय २५, रा. शेटफळ गढे, ता. इंदापूर, जि. पुणे) हे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना त्यांची आरोपी उमेश जरग याच्याशी ओळख झाली. त्यानंतर आरोपींनी त्यांना गुंतवणुकीच्या योजनांची माहिती दिली. (Pune Investment Fraud) बाणेर येथील ऑर्चिड हॉटेल, वाकडमधील टिपटॉप आणि हिल्टन हॉटेलमध्ये भव्य सेमिनार आयोजित करून एआय बॉट ट्रेडिंग आणि टीएलसी क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून मोठा नफा मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले. या आमिषाला बळी पडून भोसले यांनी स्वतःच्या तसेच आई-वडिलांच्या बँक खात्यांतून आणि रोख स्वरूपात एकूण २२ लाख ७० हजार रुपये गुंतवले. मात्र, अपेक्षित परतावा मिळाला नाही. गुंतवलेली रक्कमही परत मिळत नसल्याने फसवणुकीचा प्रकार समोर आला.

ईडीच्या कारवाईनंतर कंपन्यांची नावे बदलली

फेब्रुवारी २०२५ मध्ये ‘बोट ब्रो’ कंपनीवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कारवाई केल्यानंतर गुंतवणूकदारांना पैसे काढण्याचे पर्याय बंद करण्यात आल्याचा आरोप आहे. Pune Investment Fraud त्यानंतर ‘बोट अल्फा’, ‘क्रॉस मार्केट’ आणि ‘माईन क्रिप्टो’ अशा वेगवेगळ्या नावांनी वेबसाइट आणि डोमेन तयार करण्यात आले. जुन्या गुंतवणुकीची रक्कम मिळवण्यासाठी नव्याने गुंतवणूक करण्याच्या अटी घालून नागरिकांकडून आणखी पैसे उकळण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. मुख्य प्रमोटर्स दुबई आणि सौदी अरेबियात गेल्याचेही तपासात समोर आले आहे.

२१ गुंतवणूकदारांची १४.७० कोटींची रक्कम अडकली

आर्थिक गुन्हे शाखेच्या प्राथमिक चौकशीत भोसले यांच्यासह २१ प्रमुख गुंतवणूकदारांची एकूण १४ कोटी ७० लाख ९७ हजार रुपयांची रक्कम अडकल्याचे समोर आले आहे. पुणे, मुंबई, सातारा आणि बारामती परिसरातील नागरिकांचा यामध्ये समावेश आहे. पोलिस उपनिरीक्षक रेश्मा संभाजी मोरे पुढील तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×