७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
marathinews24.com
पुणे – Pune Mephedrone Drug Seizure : शहरातील मार्केट यार्ड भागात रिक्षातून मेफेड्रोन विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना अमली पदार्थ विराेधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून मेफेड्राेन, रिक्षा, रोकड असा सात लाख पाच हजार ४२९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सुभाषगौडा, गुरण्णा चौधरी (वय ३२), बाप्पू भीमा भालशंकर (वय २८) शाहरुख मेहबूब खान (वय २८, तिघे रा. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरनगर, मार्केट यार्ड) यांना अटक करण्यात आली.
वाकडेवाडी एसटी स्थानकात महिलेच्या सुटकेसमधून ऐवज चोरीला – सविस्तर बातमी
अमली पदार्थ विराेधी पथकातील कर्मचारी शनिवारी ( दि. १४ नोव्हेंबर) मार्केट यार्ड भागात गस्त घालत होते. त्यावेळी मार्केट यार्डातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेश द्वारासमोर एक रिक्षा थांबली असून, रिक्षातील तिघे जण मेफेड्रोन विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. (Pune Mephedrone Drug Seizure) त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून तिघांना पकडले. त्यांच्याकडून २४ ग्रॅम ६३ मिलीग्रॅम मेफेड्रोन, मोबाइल, रिक्षा, दोन हजार ८२९ रुपये असा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरुद्ध मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अतिरिक्त पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, उपायुक्त गैाहर हसन, सहायक आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीवन माने, सहायक निीरक्षक अफरोज पठाण, अमोल जगताप, सतीश चव्हाण, शरद धोंडे, संदीप देवकाते यांनी ही कारवाई केली.






















