पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी-चिंचवडमधून हद्दपार; पोलीस उपायुक्त डॉ. सागर कवडे यांचे आदेश
marathinews24.com
पुणे – Pune Police Crime News : सिंहगड रस्ता भागात दहशत माजविणाऱ्या सराइतांना पुणे शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त डाॅ. सागर कवडे यांनी तडीपार करण्याचे आदेश दिले. मंदार श्रीधर दारवटकर (वय ३० रा. राजवर्धन सोसायटी, वडगाव बुद्रुक, सिंहगड रस्ता), आकाश सुभाष गाडे (वय २९), सागर मोहन राठोड (वय २३, दोघे रा. श्रीरामनगर, ब्रह्मा हाॅटेलशेजारी, सिंहगड रस्ता) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत. दारवटकर, गाडे, राठोड हे सराईत आहेत. त्यांच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहे.
पुण्यात मेफेड्रोन विक्री प्रकरणात तिघे अटकेत – सविस्तर बातमी
तिघांनी टोळी तयार करुन गुन्हे केले होते. तिघांना पुणे शहर, जिल्हा, तसेच पिंपरी-चिंचवड शहरातून तडीपार करण्याचा प्रस्ताव पोलिसांनी तयार केला होता. या प्रस्तावाला मंजूरी दिल्यानंतर पोलीस उपायुक्त डाॅ. सागर कवडे यांनी तिघांना सहा महिन्यांसाठी तडीपार करण्याचे आदेश दिले. पोलीस उपायुक्त कवडे, सहायक आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, सहायक पोलीस निरीक्षक समीर गायकवा़ड, उपनिरीक्षक भूपेश साळुंके, पंकज देशमुख, अरविंद धावडे, अश्विनी त्रिभूवन यांनी ही कारवाई केली.






















