Breking News
Pune Crime Branch Arrest : रेकॉर्डवरील आरोपी पोलिसांच्या जाळ्यातSwargate Bus Theft Case : एसटी प्रवासात गुंगीकारक गोळ्या खाण्यास देउन प्रवाशांची लुटPune Police Farmer Aid : खाकीचा बळीराजाला आधार; पुणे पोलीस देणार ३ कोटी रुपयेEach Woman Champion Maharashtra : महाराष्ट्रातील ३५ हजार महिला उद्योजिकांना सक्षम करण्याचे उद्दिष्टSadashiv Peth ATM Theft : सदाशिव पेठेत एटीएमची तोडफोड करुन रोकड चोरीचा प्रयत्नPune Crime News : पुण्यातील रास्ता पेठ, लोणी काळभाेर भागात घरफोडीPune Crime News : सिंहगड रस्ता भागात दहशत माजविणारा गुंड तडीपारPune Traffice Police : दिवाळीत व्यापारी पेठेत दिवसा मालवाहू वाहनांना बंदीPune RTO Action : दिवाळीत खासगी बसने भाड्यापेक्षा अधिक आकारणी केल्यास कारवाई होणारFake Currency Racket Pune : बनावट ५०० रुपयांच्या नोटांचा कारखाना उध्वस्त, चौघांना बेड्या

Pune Police Farmer Aid : खाकीचा बळीराजाला आधार; पुणे पोलीस देणार ३ कोटी रुपये

Pune Police Farmer Aid

पुणे पोलीस दल देणार एक दिवसाचे वेतन

marathinews24.com

पुणे – Pune Police Farmer Aid : दुष्काळाच्या संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी शहर पोलीस दलाने सामाजिक बांधिलकी जपणारा निर्णय घेतला आहे. दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उपलब्ध होणार आहे. पोलिस दलाच्या योगदानातून संकटात सापडलेल्या बळीराजाला दिलासा देण्याचा प्रयत्न आहे.

महाराष्ट्रातील ३५ हजार महिला उद्योजिकांना सक्षम करण्याचे उद्दिष्ट – सविस्तर बातमी 

पुणे पोलिसांच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे. शहर पोलिस दलात उपनिरीक्षकापासून ते पोलिस आयुक्त पदापर्यंत जवळपास २ हजार अधिकारी कार्यरत आहेत. तर, सुमारे १० हजार कर्मचारी विविध पदावर कर्तव्य बजावत आहेत. सर्वांच्या एक दिवसाच्या वेतनातून मोठा निधी उभा राहणार आहे. पोलीस अधिकाऱ्यांचे एका दिवसाचे वेतन (पदानुसार) साधारण तीन ते सात हजार रुपयांपर्यंत आहे. तर, कर्मचाऱ्यांचे एका दिवसाचे वेतन सरासरी दोन हजार रुपयांच्या आसपास आहे. (Pune Police Farmer Aid) त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या एका दिवसाच्या वेतनातून दोन कोटी रुपये, तर अधिकाऱ्यांच्या वेतनातून जवळपास १ कोटी रुपये जमा होण्याचा अंदाज आहे. अशा प्रकारे ३ कोटी रुपयांच्या आसपास रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा होणार आहे. कर्तव्य बजावताना कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या पोलिस दलाने सामाजिक उत्तर दायित्वातूनही पुढाकार घेतला आहे. पोलिसांच्या एका दिवसाच्या वेतनातून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठा आर्थिक हातभार लागणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×