Breking News
Pune RTO Action : दिवाळीत खासगी बसने भाड्यापेक्षा अधिक आकारणी केल्यास कारवाई होणारFake Currency Racket Pune : बनावट ५०० रुपयांच्या नोटांचा कारखाना उध्वस्त, चौघांना बेड्याRana Suryavanshi Attack Case : हल्ल्यासाठी पैशांची साखळी, सूत्रधाराचा शोध सुरूPune Crime News : गांजा तस्करीत पुणे पोलिसाला पकडलेPune Bike Theft Case : पुण्यात दुचाकी चोरी करणार्‍याला अटक; ५ गाड्या जप्तPune Election News : पुणे विभाग पदवीधर व पुणे विभाग शिक्षक मतदार संघांच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्जPune Online Scam : तामिळनाडूचा मुख्यमंत्री असल्याचे भासवले, महिलेला २६ लाखांचा गंडाST Bus Theft Pune : एसटी प्रवासात महिलेचा ऐवज चोरलाPratidhwani Book Launch Pune : ‘प्रतिध्वनी’ पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन; ‘स्मृतींचा मागोवा’ मैफिलीने रसिकांना मंत्रमुग्ध केलेKatraj Molestation Case : पुण्यात तरुणीची छेड काढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Pune RTO Action : दिवाळीत खासगी बसने भाड्यापेक्षा अधिक आकारणी केल्यास कारवाई होणार

Maharashtra Vehicle Inspection : महाराष्ट्राबाहेरील खासगी वाहनांच्या तपासणीसाठी परिवहन विभागाची विशेष मोहीम

पुणे आरटीओचा इशारा; तक्रारी नोंदविण्याचे आवाहन

marathinews24.com

पुणे – दिवाळीच्या कालावधीत खासगी प्रवासी बसमालकांनी शासनाने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक भाडे आकारू नये. निर्धारित भाड्यापेक्षा अधिक आकारणी करणाऱ्या बसमालकांविरुद्ध मोटार वाहन कायदा, १९८८ व संबंधित नियमांनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी दिला आहे. दिवाळीच्या काळात प्रवाशांची संख्या वाढत असल्याने काही खासगी बसमालकांकडून मनमानी पद्धतीने अधिक भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारी येतात. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे बसमालक संघटनेच्या प्रतिनिधींसमवेत बैठक घेण्यात आली.

तामिळनाडूचा मुख्यमंत्री असल्याचे भासवले, महिलेला २६ लाखांचा गंडा – सविस्तर बातमी

प्रवाशांची आर्थिक पिळवणूक रोखणे आणि रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाय योजनांबाबत चर्चा बैठकीत करण्यात आली. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले, परिविक्षाधीन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल फसले, परिविक्षाधीन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित आर्सुळ यांच्यासह बसमालक संघटनेचे एकूण २६ प्रतिनिधी उपस्थित होते. शासनाने २० एप्रिल २०१८ रोजीच्या निर्णयानुसार खासगी बसमालकांना निर्धारित केलेल्या भाड्याच्या मर्यादेतच प्रवासी भाडे आकारणे बंधनकारक आहे. या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर दिवाळीच्या कालावधीत विशेष लक्ष ठेवून कारवाई करण्यात येणार आहे.

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी बसचालकांनी मद्यपान करून वाहन चालवू नये, वाहन चालविताना भ्रमणध्वनीचा वापर करू नये, वाहन चालविताना सुरक्षिततेचे नियम पाळावेत, प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी आणि वाहनातील सर्व आवश्यक कागदपत्रे वैध स्थितीत ठेवावीत. प्रवाशांनी अधिक भाडे आकारणी किंवा इतर नियमभंग आढळल्यास व्हॉट्सॲप क्रमांक ८२७५३३०२०९ यावर संबंधित तक्रार नोंदवावी. आपले नाव, भ्रमणध्वनी क्रमांक आणि तिकिटाचा छायाचित्रासह वरील व्हॉट्सॲप क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top
×