Breking News
Pune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवलेPune Grand Tour 2027 : शेतीमालाच्या बाजारपेठांपासून पर्यटनापर्यंत नव्या संधी; ‘पुणे ग्रँड टूर’साठी ३९ ग्रामपंचायतींनी मांडला आभाराचा ठरावSahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावलेHadapsar Dog Death Case : हडपसरमध्ये मारहाणीत भटक्या श्वानाचा मृत्यूPune Public Drinking Assault Case : दारु पिण्यास मनाई केल्याने तिघांना मारहाणpune molestation case : महिलेचा विनयभंग; पुण्यात माजी पोलीस अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल14 Women Sexual Exploitation Case : धक्कादायक….लग्नाच्या आमिषाने तब्बल १४ महिलांचे लैंगिक शोषणSTEP Skill Training Maharashtra : अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमाचे ‘संत रोहिदास अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम’ असे नामकरण : मंत्री मंगल प्रभात लोढा

Rabi Season Seed Subsidy : रब्बी हंगाम २०२६ साठी प्रमाणित बियाणे वितरणाकरिता महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

रब्बी हंगाम २०२६, प्रमाणित बियाणे, हरभरा बियाणे, ज्वारी बियाणे, महाडीबीटी पोर्टल, बियाणे अनुदान, कृषी विभाग पुणे, शेतकरी योजना, अनुदानित बियाणे, महाबीज, आत्मनिर्भरता अभियान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, Rabi Season Seed Subsidy, Seed Subsidy Scheme, MahaDBT Farmer, Certified Seeds, Chickpea Seeds, Jowar Seeds, Agriculture Department Pune, Farmer Scheme

कृषी विभागाचे आवाहन

marathinews24.com

पुणे – Rabi Season Seed Subsidy ” केंद्र शासनाच्या आत्मनिर्भरता अभियान २०२६-२७ अंतर्गत प्रमाणित बियाणे वितरण कार्यक्रम पुणे जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत रब्बी हंगाम २०२६ साठी हरभरा पिकाचा समावेश करण्यात आला असून, पात्र शेतकऱ्यांनी अनुदानित बियाणे मिळविण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

प्रवासी वाहतुकीतून मालवाहतूक करणाऱ्या १८ वाहनांवर कारवाई; २ लाख १५ हजारांचा दंड – सविस्तर बातमी 

या कार्यक्रमांतर्गत हरभरा पिकाच्या विकासासाठी पाच वर्षांच्या आतील प्रमाणित बियाणे वितरणाकरिता पुणे जिल्ह्यास ४२१.६७ क्विंटल लक्ष्यांक देण्यात आला आहे. Rabi Season Seed Subsidy पाच वर्षांतील, मात्र दहा वर्षांपर्यंतच्या कालावधीतील प्रमाणित बियाण्यांसाठी १०० क्विंटल लक्ष्यांक निश्चित करण्यात आला आहे.

पाच वर्षांतील प्रमाणित बियाण्यांसाठी बियाण्याच्या किमतीच्या ७५ टक्के किंवा प्रतिक्विंटल ६ हजार रुपये यापैकी जे कमी असेल, त्या मर्यादेत अनुदान देण्यात येणार आहे. तसेच पाच वर्षांपेक्षा अधिक, परंतु दहा वर्षांपर्यंतच्या कालावधीतील प्रमाणित बियाण्यांसाठी बियाण्याच्या किमतीच्या ५० टक्के किंवा प्रतिक्विंटल ४ हजार रुपये यापैकी जे कमी असेल, त्या मर्यादेत अनुदान देण्यात येणार आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानांतर्गत रब्बी हंगाम २०२६ साठी हरभरा व ज्वारीच्या प्रमाणित बियाणे वितरणाचे लक्ष्यांकही पुणे जिल्ह्यास प्राप्त झाले आहेत. दहा वर्षांपर्यंतच्या कालावधीतील प्रमाणित बियाण्यांसाठी २ हजार ६९० क्विंटल, तर दहा वर्षांवरील प्रमाणित बियाण्यांसाठी १ हजार ९०० क्विंटल लक्ष्यांक निश्चित करण्यात आला आहे. दहा वर्षांपर्यंतच्या कालावधीतील बियाण्यांसाठी प्रतिक्विंटल ३ हजार रुपये, तर दहा वर्षांवरील बियाण्यांसाठी प्रतिक्विंटल १ हजार ५०० रुपये अनुदान देय राहणार आहे. या योजनेचा लाभ एका शेतकऱ्यास जास्तीत जास्त एक हेक्टर क्षेत्रापर्यंत घेता येणार आहे. अनुदानित बियाणे मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर जास्तीत जास्त अर्ज करावेत,शेतकऱ्यांना प्रमाणित बियाण्यांचा पुरवठा महाबीजच्या वितरकांमार्फत करण्यात येणार आहे, असे कृषी विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×