Breking News
Fake Currency Racket Pune : बनावट ५०० रुपयांच्या नोटांचा कारखाना उध्वस्त, चौघांना बेड्याRana Suryavanshi Attack Case : हल्ल्यासाठी पैशांची साखळी, सूत्रधाराचा शोध सुरूPune Crime News : गांजा तस्करीत पुणे पोलिसाला पकडलेPune Bike Theft Case : पुण्यात दुचाकी चोरी करणार्‍याला अटक; ५ गाड्या जप्तPune Election News : पुणे विभाग पदवीधर व पुणे विभाग शिक्षक मतदार संघांच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्जPune Online Scam : तामिळनाडूचा मुख्यमंत्री असल्याचे भासवले, महिलेला २६ लाखांचा गंडाST Bus Theft Pune : एसटी प्रवासात महिलेचा ऐवज चोरलाPratidhwani Book Launch Pune : ‘प्रतिध्वनी’ पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन; ‘स्मृतींचा मागोवा’ मैफिलीने रसिकांना मंत्रमुग्ध केलेKatraj Molestation Case : पुण्यात तरुणीची छेड काढून पळवून नेण्याचा प्रयत्नPune Agriculture Department : पुणे जिल्ह्यात रब्बी ज्वारी लागवडीला कृषी विभागाचे प्रोत्साहन

Rana Suryavanshi Attack Case : हल्ल्यासाठी पैशांची साखळी, सूत्रधाराचा शोध सुरू

Rana Suryavanshi Attack Case

उद्योजक राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरण

marathinews24.com

पुणे – Rana Suryavanshi Attack Case : उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावरील खुनी हल्ल्याच्या तपासात सुपारीच्या पैशांच्या साखळीचे कनेक्शन उघडकीस आले आहे. १८ ऑक्टोबरला बारामतीजवळील कटफळ गावालगत राणा यांच्या तत्कालीन वाहन चालकानेच हल्लेखोरांना २ लाखांची सुपारी दिली होती. त्यानंतर अल्पवयीनासह दोघांनी त्यांच्यावर सत्तूरने वार करून गंभीररित्या जखमी केले होते. हल्ला करण्यासाठी रक्कम वाटपात मोठी साखळी असल्याचे आतापर्यंतच्या तपासात उघडकीस आले आहे.

गांजा तस्करीत पुणे पोलिसाला पकडले – सविस्तर बातमी 

आरोपी ज्ञानदेव शिंदे याने हल्लेखोर अल्पवयीन आणि पार्थ अवथळे यांना सुपारी दिली होती. तर स्वप्निल कांबळे आणि निनाद महाडिक यांनी शिंदेला हल्ला करण्यास सांगून पैसे दिले होते. मात्र, कांबळे आणि महाडिक यांना हे पैसे ज्ञानेश्वर साळुंखे आणि चैतन्य बाबर यांच्या सांगण्यावरून देण्यात आले. याप्रकरणी चैतन्य बाबर याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांना त्याच्याकडे चौकशी केली असता, (Rana Suryavanshi Attack Case) या प्रकरणाबाबत फारशी माहिती नसल्याचे त्याने सांगितले. ज्ञानेश्वर साळुंखे याला संबंधित प्रकरणाची अधिक माहिती असल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे साळुंखेला ताब्यात घेतल्यानंतर गुन्ह्याचा तपास आणखी पुढे जाणार आहे.

आरोपी ज्ञानदेव शिंदे याने हर्षवर्धन झोळ यांच्या सांगण्यावरून हल्ला केल्याचे बोलले जात होते. प्रत्यक्षात मात्र, तपासात याला अधिकची पुष्टी मिळाली नाही. हल्लेखोरांना पैसे देण्यासाठी जुळवाजुळव करणार्‍या साळुंखेला ताब्यात घेतल्यानंतर पैशांचा व्यवहार नेमका कसा झाला, हल्ल्याचा आदेश कोणी दिला, कारण काय होते, याचा उलगडा होण्याची शक्यता आहे. १८ ऑक्टोबरला सायंकाळी सव्वासातच्या सुमारास बारामतीत राणावर हल्ला झाला होता. हल्ल्यासाठी सत्तूरचा वापर केला असून, पोलिसांनी तो जप्त केला आहे. हल्ल्यासाठी सुपारी देण्यामागील व्यक्ती आणि पैशांच्या व्यवहाराचा तपास सुरू झाला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×