Breking News
Pune Crime Branch News : दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा सराईत गजाआडAmit Shah Pune Visit Traffic Changes : गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर; वाहतूकीत बदलKothrud Newborn Babies Celebration : कोथरुडमधील १ हजारहून अधिक नवजात बालकांचा अनोखा बालदिन सोहळBharat Sasane Pune : मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख निर्माण करणे महत्त्वाचे-भारत सासणेVishranti Hospital Pune : विश्रांती हॉस्पिटल हे कर्करोग रुग्णांसाठी आशेचा किरण – अ‍ॅडमिरल मनीष होनवाडPune Crime News : पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने लांबविलेKondhwa Flat Theft Pune : कोंढव्यात ८ फ्लॅटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्नPune Khadak Police Theft Case : २५ दिवसांत १० हजार किलोमीटरचा प्रवास करून उघडकीस आणला गुन्हाRaghoji Bhangare Freedom Fighter : सह्याद्रीच्या कपारीत गर्जना करणारा आदिवासींचा वाघ: राघोजी भांगरेSugarcane Trash Management : ढेकळवाडी येथे ऊस पाचट व्यवस्थापन कार्यक्रम संपन्न

Seva Sankalp Abhiyan 2026 : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतर्फे ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत विविध उपक्रम

Seva Sankalp Abhiyan 2026

नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ

marathinews24.com

पुणे – Seva Sankalp Abhiyan 2026 : महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ हे उद्दिष्ट समोर ठेवून नगरपरिषदेमार्फत नागरिकांना विविध शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे.

रब्बी हंगाम २०२६ साठी प्रमाणित बियाणे वितरणाकरिता महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन – सविस्तर बातमी 

या अभियानांतर्गत नगरपरिषदेमार्फत आतापर्यंत सुमारे ३५ नवीन मालमत्ता हस्तांतरण नोंदी करण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांच्या सोयीसाठी ४५ नवीन नळजोडण्या देण्यात आल्या असून, शहरातील १२ विवाह नोंदणी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. याशिवाय ६० महिला बचत गटांची नोंदणी करण्यात आली असून, नागरिकांना १८० जन्म-मृत्यू प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. या माध्यमातून नागरिकांना आवश्यक कागदपत्रे व नागरी सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

अभियानाच्या अनुषंगाने शहरातील विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. Seva Sankalp Abhiyan 2026  शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासोबतच प्लास्टिकमुक्त तळेगाव दाभाडे घडविण्याच्या उद्देशाने महिला बचत गटांना कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले. प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी करून पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करण्याबाबत यावेळी जनजागृती करण्यात आली.

नागरिकांना सुलभ व जलद सेवा मिळावी, नागरी सुविधांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा आणि स्वच्छतेविषयी जनजागृती वाढावी, या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. नागरिकांचा सहभाग वाढवून स्वच्छ, सुंदर व प्लास्टिकमुक्त शहर निर्माण करण्यासाठी नगरपरिषदेकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.

००००

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×