Breking News
Sahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावलेHadapsar Dog Death Case : हडपसरमध्ये मारहाणीत भटक्या श्वानाचा मृत्यूPune Public Drinking Assault Case : दारु पिण्यास मनाई केल्याने तिघांना मारहाणpune molestation case : महिलेचा विनयभंग; पुण्यात माजी पोलीस अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल14 Women Sexual Exploitation Case : धक्कादायक….लग्नाच्या आमिषाने तब्बल १४ महिलांचे लैंगिक शोषणSTEP Skill Training Maharashtra : अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमाचे ‘संत रोहिदास अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम’ असे नामकरण : मंत्री मंगल प्रभात लोढाMission Lakshvedh Maharashtra : ‘मिशन लक्षवेध’आणि बालेवाडी क्रीडा संकुलाच्या विकासकामांचा आढावाAmitesh Kumar Pune : तर बंदोबस्तासाठी १०० अमलदार देतो – पोलीस आयुक्त अमितेश कुमार

Seva Sankalp Junnar : ‘सेवा संकल्प’मधून आश्रमशाळांमध्ये ज्ञान, आरोग्य अन् पर्यावरणाचा जागर

Seva Sankalp Junnar

नर्सिंग मार्गदर्शन, वृक्षारोपण, स्पर्धा परीक्षा, आरोग्य जनजागृती आणि निबंध स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

marathinews24.com

पुणे – Seva Sankalp Junnar : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच त्यांच्या शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि सामाजिक जाणिवांना चालना देण्यासाठी सेवा संकल्प अभियानांतर्गत जुन्नर तालुक्यातील विविध शासकीय आश्रमशाळांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, मुथाळणे येथे विद्यार्थ्यांना नर्सिंग व्यवसाय व त्यातील करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नर्सिंग क्षेत्रातील शैक्षणिक संधी, आवश्यक कौशल्ये तसेच या क्षेत्रातील रोजगाराच्या विविध वाटांबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

‘नामघर’च्या माध्यमातून आसाम आणि महाराष्ट्राच्या वाणीचे एकरूपत्व – सविस्तर बातमी 

Seva Sankalp Junnar : जुन्नर आश्रमशाळेत वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देत वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले. आंबे आश्रमशाळा येथे विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती निर्माण करण्याबरोबरच सामान्य ज्ञान, तर्कशक्ती आणि अभ्यासाची सवय विकसित करण्याच्या उद्देशाने या परीक्षेचे आयोजन करण्यात आले.

शासकीय कन्या आश्रमशाळा, सोमतवाडी येथे ॲनिमिया तसेच मासिक पाळीविषयीचे समज-गैरसमज या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. किशोरवयीन मुलींमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी या मार्गदर्शनाचा विद्यार्थिनींना लाभ झाला.

Seva Sankalp Junnar : वडेश्वर आश्रमशाळेत सेवा संकल्प अभियानांतर्गत निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना विविध विषयांवर विचार मांडण्याची संधी देत त्यांच्या लेखनकौशल्याला आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यात आले. या विविध उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच आरोग्य, पर्यावरण, स्पर्धात्मकता, व्यक्तिमत्त्व विकास आणि सामाजिक जाणीव यांना बळकटी देण्याचा प्रयत्न करण्यात आला. सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×