Breking News
मातंग समाजाच्या स्वागताध्यक्षपदी लक्ष्मीताई पवार…एटीएममधून पैसे काढणाऱ्या दोघांची फसवणूकCrime News : धक्का लागल्याच्या वादातून टोळक्याकडून एकाचा खूनCrime News : बालेवाडीत महिलेचे दागिने हिसकावलेबाणेर-बालेवाडी वाहतूक समस्यांबाबत उच्चस्तरीय बैठक : तातडीने उपाययोजनांचे आदेशकोथरुड मध्ये वाहतूक नियंत्रणासाठी ५० वॅार्डनची नियुक्ती करा! नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देशपिंपरीत ‘अवकारीका’ चित्रपटाच्या टीमने पथनाट्य सादर करत केली स्वच्छता विषयक जनजागृतीलाखो वारकऱ्यांपर्यंत पोहचली मदत व पुनर्वसन विभागाची वारीरुद्रांग वाद्यपथक ट्रस्टचा वाद्यपूजन सराव शुभारंभ सोहळा उत्साहातपीएमपील बसमध्ये चोऱ्या करणाऱ्या अट्टल चोरट्याला अटक

“सिंहगड एपिक ट्रेल मॅरेथॅान”चे आयोजन

"सिंहगड एपिक ट्रेल मॅरेथॅान"चे आयोजन

वेस्टर्न घाट्स रनिंग फाउंडेशनच्या वतीने सिंहगड एपिक ट्रेल या आंतरराष्ट्रीय मॅरेथॅान स्पर्धेचे आयोजन

marathinews24.com

पुणे – वेस्टर्न घाट्स रनिंग फाउंडेशनच्या वतीने सिंहगड एपिक ट्रेल या आंतरराष्ट्रीय मॅरेथॅान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी जगभरातून ८ देश, भारतातील २४ राज्य व ४५ शहरातून ११ कि.मी., २१ कि. मी., ३० कि.मी., व ४२ कि.मी. अंतर धावण्यासाठी धावपट्टूंनी सहभाग घेतला आहे. स्वराज्याचा दैदीप्यमान ऐतिहासिक वारसा असलेल्या सिंहगडावर ही स्पर्धा सिंहगडाच्या वेगवेगळ्या पाच वाटांवरून पूर्ण करायची असते. सलग ११ तास चालणाऱ्या या माउंटन ट्रेल मॅरेथॉनमध्ये डोंगर -दऱ्या, चिखल, कडे-कपाऱ्या, आणि सिंहगडाच्या विविध वाटांवरून चित्तथरारक अनूभव स्पर्धकांना मिळतो. पर्यावरण संरक्षण, पुरातन वास्तू आणि गडकोट संवर्धनाच्या संदेशाबरोबरच व्यायामाचा संदेश या स्पर्धेच्या माध्यमातून दिला जातो. स्पर्धेची सुरवात आणि शेवट सिंहगडाच्या पायथ्याला आतकरवाडी गावापासून करण्यात आली.

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे बारामती नगरीत प्रशासनाच्यावतीने स्वागत – सविस्तर बातमी 

या स्पर्धेचे आयोजन वेस्टर्न घाट रनिंग फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दिग्विजय जेधे, फाऊंडेशनचे सदस्य अनिल पवार, मंदार मते, महेश मालुसरे, ॲड. राजेश सातपुते, मारूती गोळे, अमर धुमाळ यांनी केले आहे.

वेस्टर्न घाट्स रनिंग फाउंडेशन दरवर्षी सिंहगड एपिक ट्रेल या आंतरराष्ट्रीय मॅरेथॅानचे आयोजन जूनच्या अखेरच्या शनिवारी करत असते. सिंहगड एपिक ट्रेल ही स्पर्धा इंटरनॅशनल ट्रेल रनिंग असोसिएशन बरोबर निगडित आहे. ही चित्तथरारक स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणार्या सर्व शूरवीर मावळ्यांना समर्पित करण्यात आली, अशी माहिती संस्थचेचे अध्यक्ष दिग्विजय जेधे यांनी दिली.

३५० स्वयंसेवक व मित्र परिवारांनी २ दिवस घेरा सिंहगडमध्ये ठिकठिकाणी अत्यंत खेळीमेळीच्या वातवरणात स्पर्धेचे नियोजन केले आहे. दौंड, मुळशी, हवेली, वेल्हा, व पुणे शहरातून आलेल्या Team WGRF च्या मित्र परिवाराने ही स्पर्धा यशस्वी आयोजित केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top