क्रीडा गुण सवलतीचे प्रस्ताव ‘आपले सरकार’ पोर्टलवरूनच सादर करणे अनिवार्य
marathinews24.com
पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या पत्रान्वये फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांचे क्रीडा सवलतीचे प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.
विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळाव्याचे ओझर येथे आयोजन – सविस्तर बातमी
मागील वर्षांप्रमाणे यंदाही निकाल लवकर जाहीर करण्याच्या दृष्टीने क्रीडा गुण सवलतीचे प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी, पुणे यांचेकडून विभागीय मंडळाकडे केवळ ऑनलाईन पद्धतीनेच सादर करण्यात येणार आहेत. यासाठी राज्य शासनाच्या आपले सरकार पोर्टल या संकेतस्थळावर https://aaplesarkar.mahaonline.gov.in या लिंकद्वारे प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित प्रस्ताव दि. १५ एप्रिल २०२६ पर्यंत स्वीकारण्यात येतील.
विद्यार्थी, शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विहित कागदपत्रांसह अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारे संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी, पुणे यांचेकडे सादर करावेत. ऑनलाईन प्रणालीसंदर्भातील सविस्तर कार्यपद्धती User Manual मध्ये नमूद करण्यात आली असून त्यानुसार प्रस्ताव भरावेत. प्राप्त प्रस्तावांची छाननी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे.
पोर्टलवर अर्ज भरताना तांत्रिक अडचण आल्यास १८००१२०८०४० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच क्रीडा गुण प्रस्ताव सादर करण्यासंदर्भात इतर अडचणी असल्यास जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे येथील श्रीमती अश्विनी हत्तरगे (७३८७८८०४२७), श्री. दादासाहेब देवकते (९९२३९०२७७७), श्री. शिवाजी कोळी (७०२०३३०४८८) व श्रीमती ज्योती सुर्यवंशी (७७९८३०२४८१) यांच्याशी संपर्क साधावा. विहित कागदपत्रे सादर न केल्यास प्रस्ताव अपात्र करण्यात येतील. अशा वेळी त्रुटींची पूर्तता करून प्रस्ताव ऑनलाइन पद्धतीने पुन्हा सादर करण्याची जबाबदारी संबंधित विद्यार्थी, शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांतील क्रीडा शिक्षक, शिक्षक मुख्याध्यापक व प्राचार्य यांची राहील. त्रुटींबाबतची माहिती संबंधितांना ऑनलाईन प्रणालीद्वारे कळविण्यात येईल. मुदतीनंतर कोणतेही प्रस्ताव ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार नाहीत. विहित मुदतीत कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, पुणे श्री. जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.
























