Breking News
भारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड; नोबल कास्टमध्ये ॲल्युमिनियमपासून साकारला गणरायाअतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीपेन्शन कार्डच्या आमिषाने ज्येष्ठाची २४ लाखांची फसवणूक

बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांची आत्महत्या

बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांची आत्महत्या

सुसाईड व्हिडिओ बनवून उचलले टोकाचे पाऊल

marathinews24.com

पुणे – बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे शेख यांनी आत्महत्येपूर्वी २ मिनिटे ४१ सेकंदांचा खळबळजनक व्हिडिओ स्वतः रेकॉर्ड केला असून, त्यामध्ये त्यांनी कर्जबाजारीपणाची आणि थकीत पैशांची व्यथा मांडत काही बड्या भागीदारांची नावे घेतली आहेत. व्हिडिओमध्ये काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या नावाचाही उल्लेख असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

पुण्यात ठेकेदाराकडे मागितली ३७ लाखांची खंडणी – सविस्तर बातमी 

खलील शेख हे गुलटेकडी भागात राहत होते. ते ‘उत्कर्ष असोसिएट्स’ बांधकाम कंपनीत भागीदार होते. या कंपनीत एकूण ५ भागीदार होते, ज्यामध्ये खलील शेख यांच्यासह माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर आणि इतरांचा समावेश होता. लक्ष्मी रस्त्यावरील वक्फ बोर्डाची जागा विकसित करण्यासाठी भागीदारांनी मिळून हा प्रकल्प हाती घेतला होता. मात्र, वक्फ बोर्डाच्या जागेवरून निर्माण झालेल्या वादामुळे आणि स्थगिती मिळाल्यामुळे प्रकल्प रखडला. यामुळे खलील शेख हे मोठ्या प्रमाणावर कर्जबाजारी झाले होते. भागीदारांकडून आपले ५० लाख रुपये येणे बाकी होते, ते न मिळाल्यामुळे आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचा आरोप त्यांनी मृत्यूपूर्वीच्या व्हिडिओमध्ये केला आहे. शेख यांनी रात्री आत्‍महत्‍या केली. गुरूवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्‍याचे स्वारगेट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत निकम यांनी सांगितले.

दरम्‍यान या प्रकरणात रात्री उशीरापर्यंत गुन्‍हा दाखल करण्याचे काम सुरू होते. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी मांध्यमावर आपली बाजु मांडताना सांगितले, “आम्ही सर्वांनी कायदेशीर मार्गाने आणि रेराच्या सर्व परवानग्या घेऊनच हा प्रकल्प सुरू केला होता. यासाठी बँकेने ५ कोटी रुपयांचे कर्जही मंजूर केले होते. मी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक लढवल्यानंतर, राजकीय दबावातून वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाला काम थांबवण्याची नोटीस दिली. आम्ही उच्च न्यायालयात गेल्यानंतर आम्हाला क्लीन चिट मिळाली. पण या चार वर्षांत प्रकल्प रखडल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले.”खलील शेख यांना कंपनीच्यावतीने ७० ते ८० लाख रुपये आधीच पोहोच केले गेले आहेत. मात्र, त्यांनी भरायचा असलेला २५ लाखांचा जीएसटी न भरल्यामुळे काही व्यवहार रखडले होते. मी माझ्या पत्नीची भागीदारी २०२५ मध्येच कंपनीतून काढून घेतली होती,” असा दावा धंगेकर यांनी केला आहे. घटनेचा पुणे पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून, शेख यांच्या सुसाईड व्हिडिओ क्लिप्स आणि इतर पुराव्यांची छाननी केली जात आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×