एसटीमध्ये महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एसटीमध्ये महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

हडपसरमधील रवीदर्शन परिसरात घडली घटना

marathinews24.com

पुणे – एसटीमध्ये प्रवेश करताना चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील तब्बल ७० हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले आहे. ही घटना १४ फेबु्रवारीला सकाळी साडेनउच्या सुमारास हडपसरमधील रवीदर्शन परिसरात घडली आहे. याप्रकरणी ५२ महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नातीकडूनच जबरी चोरीचा प्रयत्न; कर्वेनगरमधील घटना – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला हडपसरमध्ये राहायला असून, १४ फेबु्रवारीला सकाळी साडेनउच्या सुमारास एसटी स्टॉप असलेल्या रवीदर्शन परिसरात थांबल्या होत्या. एसटी आल्यानंतर महिला गाडीत प्रवेश करीत असताना चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेउन त्यांच्या गळ्यातील ७० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले.याप्रकरणी महिला पोलीस अमलदार दिवेकर तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×