Breking News
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीरबोगस राजमा बियाणे देऊन अंबाजोगाईच्या व्यापाऱ्यांची १३ लाखांची फसवणूकनुपूर महोत्सव-२०२६ चा पुणे येथे शुभारंभ; कथ्थक,भरतनाट्यम, कुचीपुडी आणि ओडिसी नृत्य परंपरेचा अनोखा आविष्कारलष्करी अभियांत्रिकी कार्यालयातील दोन अभियंते अटकेतडीपी बाॅक्सचे कुलूप तोडणाऱ्या तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यूबुधवार पेठेतील बांगलादेशीची पोलिसांकडून ‘पाठराखण’वाहनांची तोडफोड करणारा गजाआडविवाह समारंभातून महिलेचे दागिने लंपाससंत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनअर्थसंकल्प, उद्योग आणि महिला सक्षमीकरणावर संवाद; TACCI परिषदेत डॉ. नीलम गोऱ्हे यांची भूमिका

प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलाचे अपहरणन करून खून

मृतदेह विटंबनाप्रकरणी शवागार प्रमुखासह कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा

मृतदेह नदीपात्रात टाकल्याची कबुली, पण मृतदेह आढळला नाही

marathinews24.com

पुणे – प्रेम प्रकरणातून वादविवाद झाल्यानंतर अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याचा खून करत मृतदेह डेक्कन येथील नदीपात्रात टाकल्याची घटना घडली. मुलीच्या इंस्टावरून या मुलाला भेटण्यास बोलवत दोन सख्या भावांनी व त्यांच्या साथीदाराने अपहरण करून हत्या केल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक सुनिता रोकडे यांनी दिली.

हडपसरमध्ये सराइताकडून पिस्तूल जप्त – सविस्तर बातमी

सार्थक उर्फ साहिल शिंदे (वय १५, रा. वारजे) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. दिवसभर शोध मोहिम राबवूनही सार्थकचा मृतदेह मात्र सापडू शकला नाही. याप्रकरणी अलंकार पोलिसांत अपहरणाचा गुन्हा नोंद आहे.

अलंकार पोलिसांच्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. २७ जानेवारी) सार्थक बेपत्ता असल्याची माहिती त्याच्या आईने पोलिसांना दिली. यावरून अपहरणाचा गुन्हा नोंद केला. तपास सुरू केला असता त्याचे २६ जानेवारी रोजी अपहरण झाल्याचे समोर आले. शोध घेताना दोन आरोपींची माहिती मिळाली. त्यांना ताब्यात घेऊन सखोल तपास केला. तेव्हा त्यांनी सार्थकचे अपहरणकरून खून केल्याची कबूली दिली, तसेच मृतदेह नदीत टाकून दिल्याची माहिती दिली असल्याचे वरिष्ठ निरीक्षक रोकडे यांनी सांगितले. एका मुलीला बोलत असल्यावरून ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. ताब्यात घेतलेले आरोपीही अल्पवयीन असून, ते सख्ये भाऊ आहेत. त्यांचा साथीदार फरार असून, त्याचा शोध घेतला जात आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×