Breking News
Maharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवलेPune Grand Tour 2027 : शेतीमालाच्या बाजारपेठांपासून पर्यटनापर्यंत नव्या संधी; ‘पुणे ग्रँड टूर’साठी ३९ ग्रामपंचायतींनी मांडला आभाराचा ठरावSahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावले

‘आवाज कुणाचा एसपी कॉलेजचा’; पुरुषोत्तम करंडक महाअंतिम फेरीत ‘आतल्या गाठीची बाजी

‘आवाज कुणाचा एसपी कॉलेजचा’; पुरुषोत्तम करंडक महाअंतिम फेरीत ‘आतल्या गाठीची बाजी

‌‘ठोंग्या’ ठरली सर्वोकृष्ट प्रायोगिक एकांकिका

marathinews24.com

पुणे – महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत सर परशुरामभाऊ महाविद्यालयाने सादर केलेल्या ‘आतल्या गाठी’ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावित पुरुषोत्तम करंडकावर आपले नाव कोरले. संघास पाच हजार एक रुपयांचे रोख पारितोषिक, प्रशस्तीपत्र आणि स्मृतीचिन्ह देण्यात आले. तर सर्वोकृष्ट प्रायोगिक एकांकिकेसाठी असलेला कुमार जोशी करंडक रत्नागिरी येथील फिनोलेक्स ॲकॅडमी ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नालॉजीने सादर केलेल्या ‘ठोंग्या’ या एकांकिकेला मिळाला. संघास रोख रुपये चार हजार एक, प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह देण्यात आले.

कलांमधून मिळते जीवन जगण्याची उमेद- डॉ. संगीता बर्वे – सविस्तर बातमी 

स्पर्धेतील विजेत्यांच्या नावांची घोषणा होताच स्पर्धकांनी ‘हर हर महादेव’, ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’, ‘पुरुषोत्तम करंडक कुणाचा; एसपी वाल्यांचा’, ‘आमचं नाटक आम्ही बसवतो, ‘आवाज कुणाचा एसपी कॉलेजचा’, ‘आले रे आले एसपी आले’, ‘पुरेपुर कोल्हापूर’, ‘अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन’ अशा घोषणा देत नाट्यगृह दणाणून सोडले. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची महाअंतिम फेरी दि. २६ ते दि. २८ डिसेंबर २०२५ या कालावधीत भरत नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत एकूण १७ संघांनी सादरीकरण केले. स्पर्धेचा निकाल आणि पारितोषिक वितरण समारंभ आज (दि. २८) सायंकाळी भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आला होता. स्पर्धेचे पारितोषिक वितरण ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्रीय कलोपासकचे उपाध्यक्ष सुहास जोशी, परीक्षक चंद्रशेखर ढवळीकर, संजय पवार, अमित फाळके मंचावर होते. स्पर्धेचा निकाल ॲड. राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी जाहीर केला. सांघिक द्वितीय आलेल्या ‘ग्वाही’ या एकांकिकेस श्रीराम करंडक तर सांघिक तृतीय आलेल्या ‘काही प्रॉब्लेम ये का?’ या एकांकिकेस पंडित विद्याधर शास्त्री भिडे करंडक मिळाला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल

सांघिक प्रथम : आतल्या गाठी (सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे)
सांघिक द्वितीय : ग्वाही (देशभक्त रत्नप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर)
सांघिक तृतीय- काही प्रॉब्लेम ये का? (अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर, पुणे) सर्वोकृष्ट प्रायोगिक करंडक – ठोंग्या (फिनोलेक्स ॲकॅडमी ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नॉलॉजी, रत्नागिरी).

वैयक्तिक पारितोषिके; सर्वोकृष्ट अभिनय

पुरुषोत्तम नारायण गाडगीळ करंडक : अभिषेक हिरेमठस्वामी (पोस्टमन, ग्वाही, देशभक्त रत्नप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर) अभिनय नैपुण्य : पुरुष : दिशा फाऊंडेशन करंडक : पार्थ पाटणे (विनायक, ग्वाही, देशभक्त रत्नप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर)
अभिनय नैपुण्य : स्त्री : अक्षरा बारटक्के (मंगला ग्वाही, देशभक्त रत्नप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर)
सर्वोकृष्ट वाचिक अभिनय नैपुण्य : विश्वास करंडक : शाश्वती वझे (जुई, आतल्या गाठी, सर परशुराम भाऊ महाविद्यालय, पुणे)
सर्वोकृष्ट दिग्दर्शक : चैतन्य प्रणित करंडक : अद्वय पुरकर, शाश्वती वझे, समर्थ खळदकर (आतल्या गाठी, सर परशुराम भाऊ महाविद्यालय, पुणे)

अभिनय उत्तेजनार्थ पारितोषिके : नाव, भूमिका, एकांकिका, महाविद्यालय या क्रमाने ओंकार कापसे (प्रतिक, काही प्रॉब्लेम ये का?, अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर, पुणे) आस्था काळे (दृष्टी, काही प्रॉब्लेम ये का?, अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर, पुणे) प्रांज्वळ पडळकर (वामन, वामन आख्यान, मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड, पुणे) संयोगिता चौधरी (अश्विनी, सोयरिक, आर्टस्‌, कॉमर्स, ॲण्ड सायन्स कॉलेज, नागठाणे) तन्मय राऊत (विजय, अस्तित्व, संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ)
अजित देसाई (विठ्ठल, जाळ्यातील फुले, मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी) गायत्री शिंदे, (मुक्ता-मुलगी, तुकारामाची टोपी, फिनोलेक्स ॲकॅडमी ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नॉलॉजी) रेणुका साळुंके (सोनी, जिव्हाळा, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, संभाजीनगर) स्वप्नील घोडेराव (पारंपरिक बुजगावणं, बुजगावणं, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, संभाजीनगर) मानस एलगुंदे (ओमी, स्वधर्म, श्री ब्रजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालय, अमरावती)

चिकाटी सोडू नका-मोहन जोशी

स्पर्धकांना मार्गदर्शन करताना मोहन जोशी म्हणाले, नाट्य क्षेत्रात करिअर घडवायचे असल्यास चिकाटी सोडू नका. जास्तीत जास्त मेहनत करा. तरुणांचे प्रश्न समजण्यासाठी राजकारण्यांनी पुरुषोत्तमच्या रंगमंचावरील एकांकिका पहाव्या. चंद्रशेखर ढवळीकर म्हणाले, स्पर्धेचे परिक्षण करताना आमची परिस्थिती कभी खुशी कभी गम अशी होती.

सादरीकरणात विषयांचा तोचतोचपणा सुरुवातीस जाणवला. त्यानंतर मात्र तरुणांचे प्रश्न मांडणाऱ्या, स्थानिक विषयांना हात घालणाऱ्या एकांकिका सादर झाल्या. आम्हा तीनही परिक्षकांची एक प्रतिक्रिया समान होती की, राजकारण्यांनी या स्पर्धेतील एकांकिका पहाव्यात ज्या योगे युवा पिढीचे अनेक प्रश्न त्यांना समजतील. परंतु नाट्यगृहातील खुर्ची सत्तेची नसल्यामुळे स्पर्धेतील एकांकिका पाहण्यास राजकारणी येतील की नाही असा प्रश्न आहे. महाअंतिम फेरीत सादर झालेल्या सर्व एकांकिकांमध्ये उत्तम तालीम, उत्तम नियोजन, उत्तम तांत्रिक बाजू, कलाकारांची प्रचंड मेहनत प्रकर्षाने जाणवली. विद्यार्थी लेखक मोठ्या प्रमाणात तयार व्हावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×