Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

बारामतीच्या शासकीय नर्सिंग महाविद्यालयास प्रथम मान्यता मंजूर

येत्या शैक्षणिक वर्षापासून ‘बीएससी नर्सिंग’ची प्रवेशप्रक्रिया सुरू होणार,

बारामतीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा…

marathinews24.com

बारामती- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती अंतर्गत शासकीय नर्सिंग महाविद्यालयाला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्याकडून शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रथमच संलग्नता मंजूर करण्यात आली असून मान्यतेचे पत्र आज आरोग्य विद्यापीठाकडून देण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामतीने शिक्षण क्षेत्रात आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला असून यंदापासून ‘बीएससी नर्सिंग’चा अभ्यासक्रम सुरु होत असल्याने बारामतीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

नागरिकांना उत्तम वाहतूक सेवा देण्यासाठी शासन प्रयत्नशील, उपमुख्यमंत्री – अजित पवार – सविस्तर बातमी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षात बारामती शैक्षणिक हब म्हणून विकासीत होत आहे. कोविडपश्चात राज्यातील वैद्यकीय सेवा अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने राज्यशासनाने अनेक धोरणात्मक निर्णय घेतले. त्यामध्ये राज्याच्या विविध भागात कुशल वैद्यकीय मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने शासकीय नर्सिंग महाविद्यालय उभारणीचाही प्रस्ताव होता. त्यानुसार राज्यात बारामतीसह जळगाव, लातूर, सांगली (मिरज), नंदुरबार व गोंदिया या सहा ठिकाणी नर्सिंग महाविद्यालय उभारण्यास राज्यमंत्री मंडळाने दि. १४ फेब्रुवारी २०२४ रोजी मान्यता दिली होती.
त्यानुसार सर्व निकष पूर्ण केल्याने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्याकडून शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी बारामतीच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतर्गत शासकीय नर्सिंग महाविद्यालयाला प्रथमच संलग्नता मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून ‘बीएससी नर्सिंग’च्या पहिल्या वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी शंभर प्रवेश देण्यात येणार आहेत. बारामती शासकीय नर्सिंग महाविद्यालय सुरु होणार असल्याने पॅरामेडिकल शिक्षणाचे नवीन दालन खुले होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने बारामतीत हे महाविद्यालय सुरु होत आहे.

गेल्या काही वर्षात बारामती मेडीकल हब म्हणून उदयास आले. येथील अहिल्यादेवी होळकर शासकीय वैदयकीय महाविद्यालय कार्यान्वित झाले असून दररोज किमान पाचशे ते सहाशे रुग्ण येथे औषधोपचार घेतात. आयुर्वेदीक महाविद्यालयाची चौथी बँच यंदापासून बारामतीत येणार आहे. बारामती पंचक्रोशीसाठी शासकीय नर्सिंग महाविद्यालय सुरु होणे महत्वाचे ठरणार आहे. या मान्यतेमुळे बारामती आणि परिसरातील विद्यार्थ्यांसाठी सरकारी मान्यतेचा आणि दर्जेदार वैद्यकीय शिक्षणाचा एक महत्त्वाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विशेषतः नर्सिंगसारख्या सेवाभावी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी संधी मिळणार असून, आरोग्यसेवा क्षेत्रात नवे योगदान देणारे मनुष्यबळ निर्माण होण्यास मदत होणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×