अपघातात कारमधील बाप – लेकाचा जागीच मृत्यू
Marathinews24.com
पुणे – जुना पुणे- मुंबई महामार्गावरील बॅटरी हिलपरिसरात लोणावळा शहर हद्दीत ट्रक चालकाने दिलेल्या धडकेत 5 वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातात बाप-लेक हे दोघे ठार झाले असून, काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात २० एप्रिलला रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास घडला आहे
ट्रेडिंग स्टॉक चे आमिष १२ लाख ७० हजारांना गंडा – सविस्तर बातमी
अपघातात पुण्यातील रहिवाशी चालक निलेश संजय लगड (वय 40 ) आणि त्यांचा मुलगा श्राव्य निलेश लगड (वय 10 दोघे रा. शुक्रवार पेठ पुणे) हे ठार झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुना पुणे मुंबई महामार्गावरील बॅटरी हिल येथे रविवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास सुमारास पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकचा (GJ 03 BT 6701) ब्रेक फेल झाल्याने त्याने कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. तर अलिबागकडून पुण्यात जाणारी ईरटीका कार ( MH12 UC 2800) जोरदार धडक देऊन फरफटत नेले. त्यानंतर समोरून येणाऱ्या आणखी एका गाडीला धडक देऊन संरक्षण कठड्यावर जाऊन आदळला. अपघातात कारमधील बाप- लेकाचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातात काही जण गंभीर व किरकोळ जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना वाहनांमधून काढून श्री हॉस्पिटल संजीवनी हॉस्पिटल लोणावळा याठिकाणी दाखल केले आहे. अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत सुरू केली आहे.