Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

तत्कालीन पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा

लांडगे यांच्यासह तब्बल १६ जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – वाघोलीतील १० एकर जमीन प्रकरणात चंदननगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्याविरुद्ध वाघोली पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लांडगे यांच्यासह तब्बल १६ जणांच्या विरुद्ध हा गुन्हा दाखल केला आहे.

औषध वितरकाची ४ कोटी ४० लाखाची फसवणूक – सविस्तर बातमी

अपर्णा यशपाल वर्मा (वय ५८, रा.अंधेरी मुंबई) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लांडगे यांच्यासह अन्य आरोपींविरुद्ध चंदनगर पोलिस ठाण्यात यापूर्वी फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे. आरोपींनी फिर्यादी अपर्णा वर्मा यांच्या नावे दुसरी महिला उभी करून त्यांची जमीन बळकाविण्यासाठी कट रचला. त्यांच्या नावाने बनावट दस्त तयार केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल आहे.

आरोपी लांडगे यांनी बनावट खरेदीखत करुन ते खरे असल्याचे भासवले. मिळकत साठे खतासह दुय्यम निबंधक यांच्याकडे नोंदणीकृत करून जमीन बळाकाविण्याच्या उद्देशाने फसवणूक केल्याचा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार, नोयल जोसेफ दास, नोअल जोसेफ दास, ज्योती नोयल दास, राहुल नोयल दास, रोशनी नोयल दास, जॉक्सन नोयल दास, रोहित जॉक्सन दास, गिरीश रामचंद्र कामठे, हेमंत कामठे, संतोष शेट्टी, अदित्य घावरे, अमोल भूमकर, राजेंद्र लांडगे, रामेश्वर बळीराम मस्के, सह दुय्यम निबंधक कार्यालयील एक जण, तसेच सह दुय्यम निबंधक येथील दस्त नोंदणी करणारे निबंधक अशा १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०२४ ते २३ जानेवारी २०२५ या कालावधीत ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोलीतील एकाच जमिनीवर चार अपर्णा वर्मा यांनी दावा केला आहे. वेगवेगळ्या लोकांशी संगनमत करुन चंदननगर पोलीस ठाण्याचे तत्त्कालीन पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी खरेदीखत करून जागा बळकाविण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार समोर आल्यानंतर लांडगे आणि इतरांच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची व्याप्ती विचारात घेऊन तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.

वाघोली येथील १० एकर जागेच्या मालकीवरुन चार अपर्णा वर्मा समोर आल्या होत्या. त्यांनी आपणच जमीनीच्या खऱ्या मालक असल्याचा दावा केला होता. मुंबई येथील अपर्णा वर्मा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून त्यांच्याकडून राजेंद्र लांडगे आणि साथीदारांनी साडेसहा कोटी रुपये खंडणी वसुल केली होती. दरम्यान, नोयल जोसेफ दास आणि साथीदारांनी ही जमीन १९९१ मध्ये खरेदी केली असून तिच्यावर आपली मालकी आहे.

आपण परदेशात असल्यामुळे सात बारा उताऱ्यावर नाव लावू शकलो नव्हतो. आता पुण्यात परतल आहोत, असा दावा करून त्यांनी जागेचे बनावट खरेदीखत करुन ते खरे असल्याचे भासविले. ही मिळकत साठेखत सह दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात नोंदणीकृत करुन अपर्णा वर्मा यांची जमीन बळकाविण्याच्या उद्देशाने फसवणूक केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक डांगे अधिक तपास करीत आहेत.

जमिनीवर दाव्यासाठी ४ अपर्णा वर्मा पुढे आल्या होत्या

वाघोली येथील १० एकर जमिनीबाबत चार अपर्णा वर्मा पुढे आल्या होत्या. त्यातील नगर, इस्लामपूर आणि राजस्थानमधील अपर्णा वर्मा या बनावट असल्याचे पोलीस चौकशीत समोर आले असून, त्यांनी न्यायालयात दाखल केलेले दावे मागे घेतले आहेत. या प्रकरणातील फिर्यादी अपर्णा वर्मा पुण्यात असताना त्यांनी जमीन खरेदी केली होती.

त्यानंतर त्या दुबईला गेल्या होत्या. सध्या त्या मुंबईत आल्या आहेत. आतापर्यतच्या तपासात या अपर्णा वर्मा यांची या जमिनीवर मालकी असल्याचे दिसून येत आहेत, असे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांनी सांगितले. याप्रकरणाचा तपास सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×