Breking News
मातंग समाजाच्या स्वागताध्यक्षपदी लक्ष्मीताई पवार…एटीएममधून पैसे काढणाऱ्या दोघांची फसवणूकCrime News : धक्का लागल्याच्या वादातून टोळक्याकडून एकाचा खूनCrime News : बालेवाडीत महिलेचे दागिने हिसकावलेबाणेर-बालेवाडी वाहतूक समस्यांबाबत उच्चस्तरीय बैठक : तातडीने उपाययोजनांचे आदेशकोथरुड मध्ये वाहतूक नियंत्रणासाठी ५० वॅार्डनची नियुक्ती करा! नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देशपिंपरीत ‘अवकारीका’ चित्रपटाच्या टीमने पथनाट्य सादर करत केली स्वच्छता विषयक जनजागृतीलाखो वारकऱ्यांपर्यंत पोहचली मदत व पुनर्वसन विभागाची वारीरुद्रांग वाद्यपथक ट्रस्टचा वाद्यपूजन सराव शुभारंभ सोहळा उत्साहातपीएमपील बसमध्ये चोऱ्या करणाऱ्या अट्टल चोरट्याला अटक

दुबईत ओैषध निर्यात करण्याची बतावणी

ओैषध वितरकाची ४ कोटी ४० लाखांची फसवणूक

marathinews24.com

पुणे – दुबईत ओैषध निर्यात करण्याची बतावणी करुन ओैषध वितरकाची ४ कोटी ४० लाखांची औषधे घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, त्यांनी अशा पद्धतीने आणखी काही वितरकांची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याबाबत नीलेश सोहनलाल सोनिगरा (वय ४६, रा. मुकुंदनगर) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ज्वेलर्सचा दरवाजा तोडून १५ लाखाची चोरी – सविस्तर बातमी

सोनाली गिरीगोसावी (वय ४२, रा. कोहिनुर ग्लोरी सोसायटी, महंमदवाडी ) आणि जयेश वसंत जैन (वय ४१, रा. भक्तीपूजा अपार्टमेंट, महर्षीनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश सोनिगरा यांचे न्यू अमर फार्मास्युसिटकल्स औषधे विक्रीचा व्यवसाय आहे. ते पुण्यातील ओैषध विक्रेते, रुग्णालयांना ओैषध पुरवठा करतात. २०२० मध्ये सोनिगरा यांची सोनाली गिरीगोसावी हिच्याशी ओळख झाली. तिचे ओम साईनाथ मेडिकल हे ओैषध विक्री दुकान आहे. सोनिगरा हे तिला उधारीवर औषधे देत होते. गिरीगोसावी हिने सोनिगरा यांची नोव्हेबर २०२४ मध्ये जयेश जैन याच्याशी ओळख करुन दिली. त्याचे गुरुवार पेठेत सृष्टी हेल्थकेअर हे ओैषध विक्रीचे दुकान आहे.

जयेश जेैन याने माझी दुबई येथील कंपनीच्या संचालकाबरोबर ओळख असून त्यांना मोठ्या प्रमाणावर औषधांच्या साठ्यांची आवश्यकता आहे, असे सांगितले. जयेश जैन हा घाऊक विक्रेता आहे. तो व्यवहारात फसविणार नाही, असे गिरीगोसावीने सोनिगरा यांना सांगितले.

विश्वास ठेवून १३ मार्च ते ८ मे दरम्यान या कालावधीत ४ कोटी ४० लाख ३५ हजार ९०५ रुपयांची औषधे एक महिन्याच्या उधारीवर गिरीगोसावीच्या ओम साईनाथ मेडिकल्सच्या नावाने दिली. त्यासाठी तिने ६० धनादेश दिले होते. त्यानंतर ती पैसे देण्यास टाळाटाळ करु लागली. बँकेत धनादेश जमा करतो, असे सोनिगरा यांनी तिला सांगितले. तेव्हा खात्यात पैसे नसल्याचे तिने सांगितले. त्यानंतर तिने सोनिगरा यांच्याशी संपर्क तोडला. सोनिगरा यांनी चौकशी केली. तेव्हा तिने आणखी ओैषध विक्रेत्याकडून उधारीवर ८३ लाख ३८ हजार रुपयांची ओैषधे घेऊन फसवणूक केल्याची माहिती मिळाली.

गिरीगोसावी हिने जयेश जैन याच्याशी संगनमत केले. ही ओैषधे तिने जैन याच्या ओैषध विक्री दुकानात दिल्याचे उघडकीस आले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण घोडके तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top