Breking News
पुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे

शालेय साहित्य खरेदी आणि चतुर्थीनिमित्त गर्दी

चैत्री यात्रा उत्सव-२०२६ च्या पार्श्वभुमीवर वाहतूक वळविण्याचे आदेश जारी

मध्यभागातील रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत

marathinews24.com

पुणे – शहरातील विविध भागात शालेय साहित्य, तसेच संकष्टी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची गर्दी झाल्याने शनिवारी दिवसभर मध्यभागात कोंडी झाली होती. मध्यभागातील बहुतांश रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ सोमवारपासून (१६ जून) होत आहे. त्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

तत्कालीन पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा – सविस्तर बातमी

शालेय साहित्य खरेदीसाठी शनिवारी सकाळपासून आप्पा बळवंत चौकातील दुकानांमध्ये गर्दी झाली होती. खरेदीसाठी शहर, तसेच उपनगरातून मोठ्या संख्येने पालक मुलांसोबत आले होते. आप्पा बळवंत चौक ते छत्रपती शिवाजी रस्त्यावरील हुतात्मा चौक (बुधवार चौक) भागात गर्दी झाली होती, तसेच संकष्टी चतुर्थी असल्याने श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी झाली होती. शालेय साहित्य खरेदी आणि चतुर्थी असल्याने वाहतूक पोलिसांनी या भागतील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली. आप्पा बळवंत चौकाकडून हुतात्मा चौकाकडे जाणारा रस्ता वाहतुकीस बंद ठेवला होता.

या भागातील वाहतूक बाजीराव रस्तामार्गे वळविण्यात आली होती. छत्रपती शिवाजी रस्ता भागातील वाहतूक विस्कळीत झाली होती.

पावसामुळे अनेक जण मोटारीतून मध्यभागात आले होते. मोटारींमुळे मध्य भागातील वाहतुकीत कोंडीत भर पडली. बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप उद्यानापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठेतील अरुंद रस्त्यावर अनेकांनी दुचाकी लावल्या होत्या. दुचाकी लावून अनेकजण आप्पा बळवंत चौकात खरेदीसाठी आले होते.

मोठ्या संख्येने वाहने रस्त्यावर आल्याने लक्ष्मी रस्ता, गणेश रस्ता, छत्रपती शिवाजी रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. मध्यभागतील अरुंद रस्त्यांवरून चालणेदेखील अवघड झाले होते. पावसाची शक्यता असल्याने अनेकजण सहकुटुंब खरेदी आणि दर्शनासाठी मोटारी घेऊन आले होते. मध्यभागातील वाहतूक कोंडी विचारात घेऊन अनेकांनी नदीपात्रातील रस्ता, तसेच महापालिका भवन परिसरात मोटारी लावल्या होत्या.

वाहतूक शाखेकडून नियोजन

शालेय साहित्य खरेदी, तसेच संकष्टी चतुर्थी असल्याने मोठ्या संख्येने नागरिक मध्यभागात आले होते. सकाळपासून या भागात गर्दी वाढली होती. वाहतूक नियोजनासाठी मध्यभागातील प्रमुख चौकात वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले होते. मोठ्या संख्येेने वाहने रस्त्यावर आल्याने वाहतूक नियोजन करताना पोलिसांची दमछाक झाली. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांकडून आप्पा बळवंत चौकाकडून छत्रपती शिवाजी रस्त्याकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला, असे विश्रामबाग वाहतूक विभागाच्या पोलीस निरीक्षक संगीता जाधव यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×